News Flash

पाहा: नवाझुद्दीन सिद्दीकीच्या ‘मांझी’चा ट्रेलर

अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीची प्रमुख भूमिका असणारा बहुचर्चित 'मांझी- द माऊंटन मॅन' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

| July 16, 2015 08:04 am

पाहा: नवाझुद्दीन सिद्दीकीच्या ‘मांझी’चा ट्रेलर

अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीची प्रमुख भूमिका असणारा बहुचर्चित ‘मांझी- द माऊंटन मॅन’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील दशरथ मांझींच्या भूमिकेतील नवाझुद्दीन सिद्दीकी प्रेक्षकांवर चांगलाच प्रभाव पाडून जातो. याशिवाय, दशरथ मांझीच्या बायकोची भूमिका साकारणाऱ्या राधिका आपटेनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.  आपल्या खेड्यातील लोकांना दळणवळणाचा सोपा मार्ग मिळावा यासाठी दशरथ मांझीने एकट्याने १९६० ते १९८२ या २२ वर्षाच्या कालावधीत डोंगर पोखरून ३० फुट रुंदीचा ३६० फुटाचा रस्ता तयार केला होता. त्यामुळे त्यांची ‘माऊंटन मॅन’ अशी ओळख निर्माण झाली होती. आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमधून नवाझुद्दीन सिद्दीकीचा दर्जेदार अभिनय प्रेक्षकांनी पाहिला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना येत्या २१ ऑगस्टला प्रदर्शित होत असलेल्या ‘मांझी- द माऊंटन मॅन’ची उत्सुकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2015 8:04 am

Web Title: watch trailer nawazuddin siddiqui in and as manjhi the mountain man
Next Stories
1 पाहा : ‘बाजीराव मस्तानी’चा ट्रेलर
2 पाहा: बाजीराव मस्तानीचा फर्स्ट लूक
3 छोटय़ा पडद्यावर ‘रामा’चे पुनरागमन!
Just Now!
X