जेसन मोमोआ हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. अ‍ॅक्वामॅन या सुपरहिरोपटामुळे नावारुपास आलेला जेसन सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. परंतु आज यशाच्या शिखरावर असलेला हा अभिनेता काही वर्षांपूर्वी चक्क दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत होता. केवळ ब्रेड आणि मीठ खाऊन दिवस काढणाऱ्या जेसनने करिअरमधील एक चकित करणारा अनुभव सांगितला.

अवश्य पाहा – ‘नग्नता हा गुन्हा असेल तर नागा साधूंना अटक करा’; अभिनेत्रीचा मिलिंद सोमणला पाठिंबा

हॉलिवूड रिपोर्टरला दिलेल्या मुलाखतीत जेसनने आपल्या करिअरवर भाष्य केलं. तो म्हणाला, “गेम ऑफ थ्रोन्स या मालिकेत मी खाल ड्रायगोची भूमिका साकारली होती. या सुपरहिट मालिकेमुळे मी सुपरस्टार होईन अशी अपेक्षा होती. परंतु माझी अपेक्षा फोल ठरली. मी कामाच्या शोधात होतो पण मला हवं तसं काम मिळत नव्हतं. चांगले प्रोजेक्ट नसल्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत होती. पत्नी आणि मुलांचं पालन पोषण करणं मला खूप कठीण जात होतं. पत्नी कंपनीमध्ये काम करायची त्यामुळे महिन्याचा खर्च कसाबसा निघायचा. अशाही काही रात्र पाहिल्या आहेत ज्यावेळी आम्ही केवळ ब्रेड आणि मीठ खाल्लं आहे. पण माझा धीर खचला नाही. मी प्रयत्न सुरु ठेवले. ऑडिशन दिली अन् आज माझ्याकडे बिग बजेट प्रोजेक्ट आहेत.”

अवश्य पाहा – नखरे करणं अभिनेत्रीला पडलं भारी; १८ व्या दिवशी मालिकेतून काढून टाकलं

जेसन मोमोआ हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. १९९९ साली ‘बेवॉच’ या मालिकेतून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘नॉर्थ शोर’, ‘द गेम’, ‘द रेड रोड’ यांसारख्या काही मालिकांमध्ये त्यानं काम केलं. मालिकांसोबतच तो चित्रपटांमध्येही कार्यरत होता. ‘जॉन्सन फॅमेली वेकेशन’, ‘बुलेट टू द हेड’, ‘पाईपलाईन’, ‘कॅनन द बार्बेरियन’ यांसारख्या काही चित्रपटांमध्ये तो झळकला होता. त्याला काम मिळत होतं. पण त्याला चांगल्या भूमिका मिळत नव्हत्या. परिणामी आर्थिक परिस्थितीही खालावत होती. पण वॉर्नर ब्रोसच्या ‘अॅक्वामॅन’ चित्रपटामुळे त्याचं नशीब बदललं. अन् आता तो एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो.