News Flash

जेव्हा काजोल- करण एकाच छताखाली येतात

करण जोहर आणि काजोल यांच्या मैत्रीचे दाखले दिले जायचे

काजोल-करण

कधी एकेकाळी दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री काजोल यांच्या मैत्रीचे दाखले दिले जायचे. एवढ्या वर्षांची मैत्री, आयुष्यात आलेले चढ-उतार या दोघांनी एकत्र पाहिले. पण नंतर त्यांच्यात काही कारणांमुळे वाद झाले आणि त्यांच्या मैत्रीत अंतर पडले. आता तर यांच्यातील तुटलेल्या नात्यांबाबत कोणाला माहीत नसेल तरच नवल. गेल्या वर्षीच्या अखेरीस या दोघांमध्ये असे काही वाद झाले की, त्यामुळे या दोघांच्या नात्यात अंतर निर्माण झाले. २५ वर्षांची मैत्रीचा शेवट अशाप्रकारे होईल याचा कोणीही विचार केला नव्हता. करणने तर या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना असेही म्हटले होते की, आता काजोल माझ्या आयुष्याचा भाग नाही. त्यामुळेच हे दोघं जर समोरा समोर आले तर काय होईल असा विचार त्यांचे चाहते कर होते.

चाहत्यांच्या मनातली ही भिती खरी ठरली असेच म्हणावे लागेल. एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान काजोल आणि करण आमने सामने आले.
त्याचे झाले असे की काल रात्री काजोल, अजय देवगणसोबत एचटी मोस्ट स्टायलिस्ट अवॉर्डच्या कार्यक्रमाला गेली होती. या कार्यक्रमाला करणही आला होता. त्यामुळे हे तिघंही एकमेकांच्या समोर येणार हे तर नक्कीच होते. मात्र शोच्या व्यवस्थापकांनी अशी काही शक्कल लढविली की, करण आणि काजोल एकमेकांसमोर आलेच नाही. व्यवस्थापकांनी वेळेचे असे काही नियोजन केले की, तिघांना एकमेकांचे चेहरेही बघता आले नाही.

पुरस्कार सोहळ्याच्या व्यवस्थापकांनी या तिघांच्या बसण्याचे स्थान आणि वेळेच्या नियोजनाबद्दल आधीच विचार करुन ठेवला होता. त्यांच्यातला वाद सर्वश्रुत असल्याने पुरस्कार सोहळ्यात जर यांचा टकराव झाला तर उगाचच माध्यमांमध्ये याबाबतची चविष्ट चर्चा रंगणार आणि सोहळ्याला गालबोट लागणार या विचाराने व्यवस्थापकांनी यांना समोरासमोर येऊच दिले नाही. सोहळ्याच्या एका बाजूला काजोल आणि अजयला जागा देण्यात आली होती, तर दुसऱ्या बाजूला करणला बसवण्यात आले होते. शिवाय या दोघांच्या येण्या-जाण्याच्या रस्त्याचीही वेगळी व्यवस्था केली होती. त्यामुळे छायाचित्रकारांना या दोघांचे एकत्र फोटो काढता आले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 9:36 pm

Web Title: what happened when kajol karan johar and ajay devgn came under the same roof at ht most stylish awards 2017
Next Stories
1 अक्षय आणि मी ‘सॉलिड’ टीम
2 Tuzhat jeev rangala : राणा-अंजली घरी परतणार!
3 बॉलिवूडचा कॉमेडी किंग गोविंदा अडकला कायद्याच्या कचाट्यात
Just Now!
X