पोर्नपटांना अलविदा करून बॉलीवूडमध्ये आलेली अभिनेत्री सनी लिओनीने आपल्या आगामी ‘मस्तीजादे’ चित्रपटातील सीन्सवर प्रतिक्रिया दिली आहे. सनीचा ‘मस्तीजादे’ चित्रपट प्रौढ विनोदी चित्रपट असून चित्रपटाच्या पोस्टरमधील सनीचा बिकनी लूक सध्या भरपूर चर्चेत आहे. सनी म्हणाली की, ‘मस्तीजादे’ चित्रपटाच्या चित्रीकरणात काहीही आक्षेपार्ह असे चित्रीत करण्यात आले आहे असे मला वाटत नाही. प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्रीचे जमेच्या बाजू आणि कच्चे दुवे असतात. या चित्रपटात सुद्धा काही सीन्स चित्रीत करण्याबाबत मी साशंक होते. पण दिग्दर्शक मिलाप झवेरी यांच्यासोबत चर्चा करून त्या सीन्सऐवजी आपल्याला काय करता येईल हे निश्चित करण्यात आले. दिग्दर्शक मिलाफ झवेरी यांनी मला समजून घेतले आणि भरपूर मदत केली. त्यामुळे चित्रपटात काही चूकच चित्रीत करण्यात आले आहे असे मला अजिबात वाटत नाही आणि लोकांची त्यावर काय प्रतिक्रिया येईल याचीही मला चिंता वाटत नाही, असे सनी म्हणाली. अनेकांचा माझ्याबद्दलचा दृष्टीकोन वेगळा आहे, पण मी त्याला गंभीरपणे कधीच घेत नाही, असेही सनीने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2016 रोजी प्रकाशित
‘मस्तीजादे’च्या चित्रीकरणात आक्षेपार्ह असं काहीच नाही- सनी लिओनी
सनीचा 'मस्तीजादे' चित्रपट प्रौढ विनोदी चित्रपट असून चित्रपटाच्या पोस्टरमधील सनीचा बिकनी लूक सध्या भरपूर चर्चेत आहे.
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड

First published on: 08-01-2016 at 17:32 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatever we shot for mastizaade is not wrong sunny leone