News Flash

आमिरने कडेकोट सुरक्षेत सहकुटुंब पाहिला ‘स्टार वॉर्स’

आमिरभोवती बंदुकधारी अंगरक्षक आणि पोलिसांची कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात होती

काही दिवसांपूर्वी असहिष्णुतेमुळे देश सोडून जावासा वाटतो, असे वादग्रस्त विधान केल्यामुळे आमिर खान टीकेच्या भोवऱ्यात सापडला होता.

बॉलीवूड अभिनेता आमिर खान बुधवारी रात्री मुंबई उपनगरातील एका चित्रपटगृहात स्टार वॉर्स हा चित्रपट पाहण्यासाठी आला होता. यावेळी आमिरबरोबर त्याची पत्नी किरण राव, मुलगी इरा आणि काही नातेवाईकही चित्रपट पाहण्यासाठी आले होते. काही दिवसांपूर्वी असहिष्णुतेमुळे देश सोडून जावासा वाटतो, असे वादग्रस्त विधान केल्यामुळे आमिर खान टीकेच्या भोवऱ्यात सापडला होता. या पार्श्वभूमीवर चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या आमिरभोवती बंदुकधारी अंगरक्षक आणि पोलिसांची कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात होती. साधारण ११ च्या सुमारास आमिरने चित्रपटगृहातून बाहेर पडला, त्यापाठोपाठ त्याची पत्नी किरण रावदेखील चित्रपटगृहातून बाहेर आली. यावेळी किरणने आम्हाला चित्रपट आवडला, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 4:56 pm

Web Title: when aamir khan stepped out with family to watch star wars with heavy security
टॅग : Bollywood
Next Stories
1 ‘तो’ क्षण मला कधीच विसरता येणार नाही, ‘मिस’टेक प्रकरणी ‘मिस कोलंबिया’ची प्रतिक्रिया
2 ‘कपूर अॅण्ड सन्स’च्या ‘मेकअप’साठी ऋृषी कपूर यांना लागतात पाच तास!
3 मी इतक्यात आई होण्याच्या विचारात नाही- सनी लिओनी
Just Now!
X