News Flash

…म्हणून शाहरुखकडून १० लाख रुपये घेण्यास बिग बींचा नकार

झगमगाटाच्या या अनोख्या दुनियेमध्ये असे काही किस्से आणि प्रसंग घडतात जे कायमच सर्वांच्या स्मरणात राहतील.

शाहरुख खान, अमिताभ बच्चन

बॉलिवूडमध्ये विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातं. पण, त्यासोबतच झगमगाटाच्या या अनोख्या दुनियेमध्ये असे काही किस्से आणि प्रसंग घडतात जे कायमच सर्वांच्या स्मरणात राहतील. मुळात कलाकारांमध्ये असणारं नातंसुद्धा नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. नात्याच्या आणाभाका आणि नात्यात असणारी सहजता ही कलाकारांमध्येही पाहायला मिळाली आहे. बिग बी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यातील नातंही असंच काहीसं आहे.

‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘मोहोब्बते’ या चित्रपटांतून बिग बी आणि शाहरुख खान यांनी स्क्रिन शेअर केली होती. या दोन्ही चित्रपटांनंतर या दोन्ही अभिनेत्यांमध्ये एक खास आणि आदराचं असं नातं निर्माण झालं. याच नात्याखातर बिग बींनी शाहरुखकडून दहा लाख रुपये घेण्यास नकार दिला होता. ‘नवभारत टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार नुकत्याच या गोष्टीचा खुलासा झाला आहे.

वाचा : महेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…

शाहरुखच्याच निर्मिती संस्थेअंतर्गत म्हणजेच रेड चिलीज या बॅनरअंतर्गत साकारण्यात आलेल्या ‘पहेली’ या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी पाहुण्या कलाराची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना निर्मिती संस्थेकडून १० लाख रुपयांचा धनादेशही देण्यात आला होता. पण, शाहरुख सोबतची आपली मैत्री आणि त्याच्यासोबतचं खास नातं लक्षात घेत बिग बींनी ही रक्कम घेण्यास नकार दिला. एक कलाकार म्हणून नेहमीच आपल्या वागण्यातून इतरांसाठी आदर्श घालणाऱ्या बिग बींच्या या निर्णयाचा अनेकांनाच अभिमान वाटला असणार यात वाद नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 2:20 pm

Web Title: when bollywood actor amitabh bachchan refused to accept rs 10 lakh from shah rukh khan for a film
Next Stories
1 ऋषी कपूर यांचं ट्विट रणबीर- आलियाच्या नात्यासंबंधी तर नाहीये ना?
2 Video: जॅकलिन फर्नांडिसनेही उडवली डेजी शहाची खिल्ली
3 ‘लवरात्री’वर विश्वहिंदू परिषदेचा आक्षेप, सलमान अडचणीत?
Just Now!
X