News Flash

‘चेहरे’मधून का हटवला रिया चक्रवर्तीचा चेहरा? निर्मात्यांनी दिलं उत्तर

अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आहे

काही दिवसांपूर्वी ‘चेहरे’ या चित्रपटाचं पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाला. यात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मात्र, ज्यावेळी पोस्ट आणि टीझर प्रदर्शित झाला, तेव्हा त्यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती न दिसल्याने प्रेक्षक गोंधळात पडले. कारण, जुलै २०१९ मध्ये जेव्हा या चित्रपटाची स्टारकास्ट घोषित करण्यात आली होती, त्यावेळी त्यात रियाचं नाव होतं.

याबद्दल निर्माता आनंद पंडितने खुलासा केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, त्यांना प्रेक्षकांच्या या गोंधळाचा अंदाज होता पण त्यांनी त्यावेळी काही काळ शांत राहण्याचा निर्णय घेतला.

एका मुलाखतीत ते म्हणाले, “आम्ही त्यावेळी काही प्रतिक्रिया दिली नाही कारण आम्ही ठरवलं होतं की रियाबद्दल काही बोलायचं नाही. आम्ही योग्य वेळ आल्यावर या प्रश्नाचं उत्तर देऊ. या वेळी तरी आम्ही काही बोलू शकत नाही.”

‘चेहरे’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी यांच्यासोबत अन्नू कपूर, रघुबीर यादव, क्रिस्टल डिसुझा हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट रुमी जाफरीने दिग्दर्शित केला असून त्याचे रिया आणि सुशांतसिंह राजपूतसोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं उघड आहे. सुशांतच्या मृत्युनंतर रुमी म्हणाला होता की, तो रिया आणि सुशांतला घेऊन एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट करणार होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 7:56 pm

Web Title: why rhea chakraborty is removed from chehre poster and teaser vsk 98
Next Stories
1 “त्यांनी असं काय केलंय म्हणून त्यांना ही संधी मिळाली?” यावर प्रियांकाने दिलं भन्नाट उत्तर
2 तुम्ही तुमचं मत मांडू नका, आमिरने सांगितले सोशल मीडियावरून निरोप घेण्याचे कारण
3 आधी ड्रग्सचा ओव्हरडोज, मग बलात्कार गायिकेने सांगितली ‘त्या’ रात्रीची घटना
Just Now!
X