छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या शोच्या १४ व्या सीझनची सुरुवात येत्या ऑक्टोंबर महिन्यात होईल. दरम्यान या नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार झळकणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती संगीतकार यशराज मुखाटे याची. परंतु खरंच यशराज ‘बिग बॉस १४’ मध्ये झळकणार का?

अवश्य पाहा – नरेंद्र मोदींचं अकाउंट हॅक करणारा ‘जॉन विक’ कोण आहे?

‘रसोडे मे कौन था’ या व्हायरल होणाऱ्या रॅप सॉगमुळे यशराज मुखाटे प्रकाशझोतात आला आहे. त्याला देखील ‘बिग बॉस’मध्ये भाग घेण्याबाबत विचारण्यात आलं होतं अशी चर्चा आहे. मात्र स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबाबत खुलासा केला. तो म्हणाला, “मला बिग बॉसकडून अशी कुठलीही ऑफर अद्याप मिळालेली नाही. या केवळ अफवा आहे. तसंच जर मला बिग बॉसचं आमंत्रण मिळालंच तर मी त्याचा स्विकार करणार नाही. कारण सध्या तरी मी संगीतकार म्हणूनच खुश आहे. नवीच गाण्यांची निर्मिती करणं हेच माझं ध्येय आहे.”

अवश्य पाहा – ड्रग्स प्रकरणात क्राईम ब्रँचने अभिनेत्रीला बजावलं समन्स

‘बिग बॉस’चं १४ वं पर्व लांबणीवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही दिवसांत मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे ‘बिग बॉस’च्या सेटवर पाणी साचलं. त्यामुळे सेट खराब झाला. शिवाय पाऊस सुरु असल्यामुळे सेट काढताही येत नाही. त्यामुळे आता पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा नवा सेट तयार केला जाईल. त्यानंतर ‘बिग बॉस’चं शूट सुरु होईल. या प्रक्रियेला किमान आणखी एक महिना लागेल असं क्रिएटिव्ह टीमने सांगितलं आहे. परिणामी ‘बिग बॉस’ चाहत्यांना १४ वं पर्व पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.