06 March 2021

News Flash

मालिकेतील सासू-सुनेच्या भांडणावर यशराजने तयार केलं रॅप साँग; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…

.. जेव्हा सासू रॅप साँग गात सूनेवर ओरडते

टीव्ही मालिकांमधील पटकथांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे अशी चर्चा अनेकदा आपण ऐकतो. अनेकदा या मालिकांमधील संभाषणांची खिल्ली देखील उडवली जाते. त्यांच्यावरील मिम्स व्हायरल होतात. परंतु संगीतकार यशराज मुखाते याने एक पाऊल पुढे जाऊन चक्क मालिकेतीन संभाषणावर एक रॅप साँगच तयार केलं आहे. या विनोदी गाण्याचा गंमतीशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अवश्य पाहा – सेम टू सेम; हुबेहुब WWE सुपरस्टार्ससारखे दिसतात हे सेलिब्रिटी

तारक मेहतामध्ये ‘या’ ग्लॅमरस अभिनेत्रीची एण्ट्री; साकारणार अंजली भाभीची भूमिका

यशराजने तयार केलेलं हे गाणं ‘साथिया साथ निभाना’ या मालिकेतील एका सीनवर आधारित आहे. या सीनमध्ये कोकिलाबेन नावाची एक सासू आपल्या सूनेला अर्थात गोपी बहुला जाब विचारत आहे. संभाषणादरम्यान या दोन व्यक्तिरेखा जे शब्द उच्चारतात त्यावर हे रॅप साँग तयार करण्यात आलं आहे. ‘साथिया साथ निभाना’ ही स्टार प्लस वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका होती. या मालिकेतील अनेक दृश्यांवर आजवर मिम्स व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर यशराजने तयार केलेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत यशराजने हे गाणं तयार करताना आलेला अनुभव सांगितला. तो म्हणाला, “केवळ मजा म्हणून मी गाणं तयार केलं होतं. मला अपेक्षा नव्हती की प्रेक्षकांना हे गाणं इतकं आवडेल. गेल्या दोन दिवसांपासून मला सातत्याने फोन येत आहेत. या एका व्हिडीओमुळे जवळपास २५ हजार फॉलोअर्स माझे वाढले आहेत. माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय अनुभव होता.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2020 5:27 pm

Web Title: yashraj mukhate on his kokilaben viral video mppg 94
Next Stories
1 थुकरटवाडीमध्ये अभिनेत्री मोनालिसा बागलची एण्ट्री
2 ‘मी गर्दीत जाणार नाही, करोनाला घरी आणणार नाही’
3 ‘कौन बनेगा करोडपती’च्या शूटिंगला सुरुवात; बिग बींनी शेअर केले खास फोटो
Just Now!
X