05 March 2021

News Flash

टीआरपीत अव्वल असलेली ‘ये है मोहब्बते’ घेणार प्रेक्षकांचा निरोप

रमण आणि इशिता या दोन व्यक्तिरेखांची जादू अजूनही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.

स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये है मोहब्बते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी. यामध्ये तिने साकारलेली ‘इशी माँ’ची भूमिका लोकप्रिय झाली आणि टीआरपी रेटिंगमध्येही ही मालिका काही काळ अव्वल ठरली. या मालिकेत आतापर्यंत बरेच बदल झाले. जुन्या कलाकारांच्या जागी अनेक नव्या कलाकारांची वर्णी लागली. मात्र, रमण आणि इशिता या दोन व्यक्तिरेखांची जादू अजूनही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. परंतु रमण आणि इशिताला प्रकाशझोतात आणणारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

एकता कपूरची ही लोकप्रिय मालिका येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये बंद होणार आहे. त्यामुळे पाच वर्षापासून प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही मालिका आता प्रेक्षकांना पाहता येणार नाही. विशेष म्हणजे या मालिकेचा शेवटचा भाग विदेशामध्ये चित्रीत होणार असल्याचं शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टीआरपीमध्ये अव्वल स्थानी असलेली मालिका अचानक एक्झिट घेणार असल्यामुळे साऱ्यांच्याच नजरा उंचावल्या आहेत. मात्र मालिका बंद करण्यामागे तसं कारणही असल्याचं सांगण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसापासून लोकप्रिय असलेली अभिनेत्री दिव्यांका सोशल मीडियावर सतत ट्रोल होत आहे. तसंच रेटिंगमध्येही ही मालिका मागे पडली आहे. या साऱ्या कारणांमुळे मालिकेचा टीआरपी कमालीचा घसरला आहे. त्यामुळेच ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान ‘ये है मोहब्बते’च्या तुलनेमध्ये सध्या ‘नागिन -३’, ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘कुंडली भाग्य’ या मालिका टीआरपीमध्ये बाजी मारत असल्याचं दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 1:37 pm

Web Title: yeh hai mohabbatein to go off air in october
Next Stories
1 सलमा खान- कतरिना कैफला नेटकऱ्यांनी म्हटलं ‘सासू- सून’; पाहा सलमानची बहीण अर्पिताची प्रतिक्रिया
2 Gold box office collection : अक्षयच्या ‘गोल्ड’ला १०० कोटींचं सुवर्ण यश
3 ‘लव सोनिया’साठी सई पुन्हा झाली ‘वजनदार’
Just Now!
X