News Flash

आता रणबीर कपूरही करणार रॅप!

बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत रॅप केल्यानंतर आता यो यो हनी सिंग सुपरस्टार रणबीर कपूरसाठी गाणे गाणार आहे.

| March 11, 2014 03:44 am

बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत रॅप केल्यानंतर आता यो यो हनी सिंग सुपरस्टार रणबीर कपूरसाठी गाणे गाणार आहे. रणबीरच्या आगामी ‘रॉय’ चित्रपटासाठी हे गाणे असणार आहे.
या गाण्यासंबंधीत गुप्तता बाळगली जात असून, दिग्दर्शक विक्रमादित्य सिंगने हे गाणे रणबीर कपूरवर चित्रीत केले जाणार असल्याचे सांगितले आहे. रणबीरसोबत काम करण्यासाठी हनी सिंगही फार उत्साहित आहे. पण, तो सदर गाण्याच्या व्हिडिओमध्ये दिसणार की नाही यासंबंधी दिग्दर्शकाने काहीच माहिती दिलेली नाही. टी-सिरीजची निर्मिती असलेल्या ‘रॉय’ चित्रपटात अर्जुन रामपाल, जॅकलीन फर्नांडिसची भूमिका असून, १२ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2014 3:44 am

Web Title: yo yo honey singh to sing for ranbir kapoors roy
Next Stories
1 ‘मॅडमजी’ प्रियांका
2 शिकागो ट्रूप डान्सर्ससोबत शिल्पाचा आयटम नंबर
3 अमिताभ बच्चन यांच्याकडून गुजरात पर्यटन प्रचाराचे फेरनियोजन
Just Now!
X