01 March 2021

News Flash

‘द कपिल शर्मा शो’ पाहायचा आहे, मग २०१८ ची वाट पाहा!

कपिलला हवा अजून काही वेळ

'द कपिल शर्मा शो'

प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कपिल शर्माचा शो बंद झाल्यावर प्रेक्षकांची आणि कपिलच्या चाहत्यांची निराशा झाली. कपिल लवकरात लवकर बरा होऊन शो पुन्हा एकदा सुरु करावा अशी अनेकांचीच इच्छा होती. मात्र प्रेक्षकांना आता ‘द कपिल शर्मा शो’ पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असंच दिसतंय. कपिल बंगळुरुच्या व्यसनमुक्ती केंद्रात दारुचं व्यसन सोडवण्यासाठी ४० दिवसांच्या कोर्सला गेला होता. तेथून परतल्यानंतर त्याच्यात सकारात्मक बदल झाले असले तरी ऑक्टोबरमध्ये शूट पुन्हा सुरु करण्यास तो अद्याप तयार नसल्याची माहिती त्याच्या एका जवळच्या मित्राने ‘डीएनए’ या वृत्तपत्राला दिली.

कपिलसंदर्भात अधिक माहिती देत तो म्हणाला की, ‘कपिल पूर्ण बरा झाल्यानंतर शो पुन्हा सुरु होईल. आरोग्य हे सर्वांत महत्त्वाचं असल्याचं त्याला जाणवलं आहे. त्यामुळे तो स्वत:साठी आणखी काही वेळ देणार आहे.’ त्याच्या आगामी ‘फिरंगी’ चित्रपटाचं चित्रीकरण अर्धवट राहिल्यामुळे तो फक्त १२ दिवसांमध्ये व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडला. नोव्हेंबरमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्याच्या प्रमोशन आणि मार्केटींगसाठीही त्याला वेळ द्यावं लागणार आहे. त्यामुळे कदाचित पुढच्या वर्षी कपिल प्रेक्षकांना पुन्हा एकदा खळखळून हसवण्यासाठी सज्ज होईल, असं म्हणायला हरकत नाही.

VIDEO : अचूक निशाणा साधणाऱ्या कतरिनाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने तब्येत बिघडत असल्यामुळे कपिल ‘द कपिल शर्मा शो’वर लक्ष केंद्रित करु शकत नव्हता. पर्यायाने वाहिनीने हा शो बंद करण्याचा निर्णय घेतला. कपिल शर्माची तब्येत खालावल्यामुळे शाहरुख खान, अजय देवगण, अक्षय कुमार यांसारख्या कलाकारांना त्याच्या सेटवर वाट पाहून परतावे लागले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 8:39 pm

Web Title: you have to wait more for the kapil sharma show
Next Stories
1 VIDEO : अचूक निशाणा साधणाऱ्या कतरिनाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
2 राणी पद्मावतीला मल्लिका म्हटल्याने ट्रोल झाला रणवीर
3 …अन् सनी तिच्यावर भडकली
Just Now!
X