News Flash

युवा सिंगर एक नंबर!

झी युवा वाहिनीवर कथाबाह्य़ कार्यक्रमांची पर्वणी

झी युवा वाहिनीवर कथाबाह्य़ कार्यक्रमांची पर्वणी

‘झी युवा’ वाहिनीवर पुन्हा एकदा कथाबा कार्यक्रमांची मेजवानी सुरु झाली असून ‘युवा सिंगर एक नंबर’ हा नवाकोरा आणि थोडा वेगळा कार्यक्रम वाहिनीवर नुकताच सुरु झाला आहे. या कार्यक्रमाचा पहिला भाग बुधवार, ७ ऑगस्ट रोजी प्रसारित झाला. वैभव मांगले आणि सावनी शेंडे या कार्यRमात परीक्षकांच्या, तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत आहे. स्पर्धकांसाठी वयाचे कुठलेही बंधन नसलेल्या या स्पर्धेत १६ गायक पाहायला मिळणार असून संपूर्ण महाराष्ट्रातून विविध वयोगटातील स्पर्धक यात सहभागी झाले आहेत.

शोचा पहिलाच भाग अगदी दणक्यात पार पडला. सर्वच स्पर्धकांचे उत्तम सादरीकरण पहिल्या भागात पाहायला मिळाले. या कार्यRमाची संकल्पना, संगीतातील उत्तम प्रतिभा आणि आर्थिक परिस्थिती यांची सांगड घालणारी असणार आहे. प्रतिभावान परंतु गरजू असणाऱ्या व्यक्तिला एक लाख रुपयांची आर्थिक मदतही दिली जाणार आहे. स्पर्धेचा भाग होऊन, आपली प्रतिभा सादर करत राहणे किंवा ती आर्थिक मदत स्वीकारणे, असे दोन पर्याय या गायकापुढे असतील. आर्थिक मदत स्वीकारणाऱ्या कलाकाराला, पुढील स्पर्धेचा भाग होता येणार नाही. ही आर्थिक मदत स्वीकारणारा एक स्पर्धक पहिल्या भागात पाहायला मिळाला.

याशिवाय प्रत्येक स्पर्धकाला एक विशिष्ट रक्कम देण्यात येणार असून ही रक्कम जतन करण्याचे  काम स्पर्धकांना आपल्या प्रतिभेच्या माध्यमातून करायचे  आहे. प्रत्येक आठवडय़ाच्या शेवटी सर्वोत्तम स्पर्धकासह, सर्वात कमी ठरलेल्या स्पर्धकाचे नावही जाहीर करण्यात येईल. आठवडय़ातील सर्वांत कमी दर्जाचे सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकाच्या खात्यातील पैसे सर्वोत्तम स्पर्धकाला मिळतील. त्यामुळेच आपल्याला मिळालेली रक्कम टिकवून ठेवणे सुद्धा स्पर्धकांच्या हातात असेल. उत्तम सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकाला त्याचा फायदा निश्चितच मिळणार आहे.  पूर्णपणे नव्या संकल्पनेसह सुरु झालेला हा कार्यक्रम संगीत क्षेत्रातील स्पर्धांचा चेहरामोहरा बदलणारा ठरेल, असा विश्वास वाहिनीकडून व्यक्त करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 1:34 am

Web Title: yuva singer ek number zee yuva mpg 94
Next Stories
1 भाऊ कदम यांचे ‘व्हीआयपी गाढव’
2 कालप्रवासाचा थरार
3 मृत्यूची सावली दूर सारताना
Just Now!
X