काही दिवासांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीमने सोशल मीडियावर ट्विट केले होते. तिचे हे ट्विट टोळधाडीमुळे निर्माण झालेल्या कृषिसंकटावर आधारित होते. पण या ट्विटनंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. त्यानंतर तिने तिचे इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटच डिलीट केले होते. आता झायराने अकाऊंट डिलीट करण्यामागचे कारण सांगितले आहे.

झायराने सोशल मीडियावरील तिचे अकाऊंट डिलीट करताच एका चाहत्याने तिला प्रश्न विचारला होता. ‘तिने तिचे अकाऊंट डिअॅक्टिवेट का केले?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर झायराने आता उत्तर दिले आहे. ‘कारण मी देखील इतरांप्रमाणेच एक माणूस आहे आणि त्यांनाही सर्वापासून ब्रेक घेण्याची परवानगी आहे’ असे म्हणत झायराने तिचे सोशल मीडिया अकाऊंट डिलीट करण्यामागचे कारण सांगितले आहे.

सोशल मीडियावर झायराने बुधवारी ट्विट केले होते. जगभरात सध्या उद्धवलेल्या परिस्थितीचा दाखला देत तिने कुरणामधील ओळी ट्विट केल्या. यामध्ये तिने पूरासारख्या नैसर्गिक संकटांपासून ते टोळधाडीपर्यंत अनेक गोष्टींचा उल्लेख करत हे दैवी संकेत असल्याचे म्हटले होते. तसेच मानव या संकेतांकडे दुर्लक्ष करतोय असा इशाराही तिने ट्विटमध्ये दिला होता. या ट्विटनंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.

तिचे हे ट्विट सध्या चर्चेत होते. तिला अनेकांनी जेव्हा या टोळधाडीमुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होईल आणि त्यांचे पिक खराब होईल तेव्हा या ट्विटचा काय अर्थ असेल असे असा प्रश्न विचारला आहे. तर अनेकांनी ‘साप देखील दंश केल्यानंतर पळून जातो’ असे म्हटले आहे.