News Flash

“त्यावेळी तुमच्या पत्नीवरही अशा कमेंट येत होत्या का?’; गावसकरांना झरीनचा सवाल

पाहा, झरीन नेमकं काय म्हणाली..

माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी पंजाब विरुद्ध बंगळुरू सामन्यात समालोचन करताना विराटवर टीका केली आणि त्यातच अनुष्काचाही उल्लेख केला. विराटची सुमार कामगिरी बघून गावसकर यांनी “लॉकडाउन था, तो सिर्फ अनुष्का के बॉलिंग की प्रॅक्टिस की इन्होंने” असं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली असून अभिनेत्री झरीन खान हिनेदेखील त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

“सुनील गावसकर, तुम्ही क्रिकेट विश्वातील मोठे खेळाडू आहात. मात्र तरीदेखील विराट कोहली आणि त्यांची पत्नी अनुष्का शर्मा यांच्यावर अशा प्रकारचं वक्तव्य करणं तुम्हाला शोभत नाही. तुम्हीदेखील एकेकाळी मैदानावर सामने गाजवले आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये एखादा दिवस चांगला, तर एखादा खराब हा असतोच. मला खरंच विचार करुन आश्चर्य वाटतं, ज्यावेळी तुम्ही मैदानात सुमार कामगिरी करत होतात. त्यावेळीदेखील तुमच्या पत्नीवर अशाच कमेंट येत होत्या? विराट उत्तम खेळल्यामुळे कधी कोणी अनुष्का शर्माचं कौतुक केलंय असं झाल्याचं मी तरी कधी पाहिलं नाही. आतापर्यंत कोहली उत्तम खेळत आला आहे. मात्र, मग आताच असं का होतंय”, असा प्रश्न झरीन खानने विचारला आहे.

आणखी वाचा- VIDEO: अनुष्काबद्दल नक्की काय म्हणाले होते गावसकर? तुम्हीच ऐका…

आणखी वाचा- गावसकर-अनुष्का वादात कंगनाची उडी, म्हणाली…

दरम्यान, या मुद्द्यावर चेन्नई वि. दिल्ली सामन्यात समालोचन करताना गावसकर यांनी आपलं रोखठोक मत व्यक्त केलं. “मी विराटच्या अपयशासाठी अनुष्काला जबाबदार ठरवलं नाही. मी कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह टिप्पणी केलेली नाही. लॉकडाउनमध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये अनुष्का विराटला गोलंदाजी करत होती. त्याबद्दल बोलताना अनुष्काने विराटला गोलंदाजी केली असं मी म्हटलं होतं. त्यात मी अनुष्काला दोषी ठरवलं नव्हतं. लॉकडाऊन काळात विराटने एवढीच गोलंदाजी खेळली होती”, असंही गावसकर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 1:32 pm

Web Title: zareen khan twitter reaction on sunil gavaskar comment over anushka sharma and virat kohli ssj 93
Next Stories
1 “स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्ज…,” रवीना टंडनने व्यक्त केला संताप
2 “हा मूर्खपणा…,” ड्रग्ज प्रकरणी सेलिब्रेटींच्या चौकशीवरुन जावेद अख्तर संतापले
3 ‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?
Just Now!
X