झी नेटवर्क गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रातील प्रेक्षकांना उत्तम दर्जाचे आणि सर्वोत्तम असे कार्यक्रम देऊन त्यांचे मनोरंजन करत आहे. झी महाराष्ट्राच्या या कुटुंबातील मग ते झी मराठी असो, झी टॉकीज, झी स्टुडीओ असो वा चोवीस तास प्रेक्षकांना जगभरातील बातम्या पोहचवणारे झी २४ तास असो. जवळजवळ सगळ्याच प्रकारचे चॅनेल्स झी नेटवर्कने प्रेक्षकांना उपलब्ध करून दिले आहेत. झी महाष्ट्राच्या याच परिवारात आता अजून एक चॅनेल लवकरच येणार आहे. झी नेटवर्क आपले प्रेक्षकांच्या हृदयात असलेले स्थान आणि ऋणानुबंध अधिक मजबूत करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात घेऊन येत आहे एक नवे चॅनेल “झी युवा” … नवे पर्व, युवा सर्व, मनाने चिरतरुण असलेल्या प्रत्येकासाठी. बवेश जानवलेकर (व्यवसाय प्रमुख झी युवा) हे या वाहिनीचे सर्वेसर्वा असणार आहेत.
झी युवा वाहिनीद्वारे मराठी टेलिव्हिजनवर एक नवे पर्व सुरु होणार आहे जे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना  टीव्ही बघण्याचा नाविन्यपूर्ण अनुभव देणार आहे. आज महाराष्ट्राच्या टेलिव्हीजन बघणाऱ्या लोकसंखे मध्ये अर्ध्याहून अधिक टक्के प्रेक्षकवर्ग हा युवा आहे आणि खास त्यांच्या आवडीसाठी अशी एक वाहिनी असावी या इच्छेने झी नेटवर्क महाराष्ट्राच्या या प्रेक्षकांसाठी झी युवा हि वाहिनी घेऊन येत आहे. जोश, उत्साह, प्रेम, शौर्य, करुणा अश्या तारुण्याच्या पंचरसांनी परिपूर्ण असलेले कार्यक्रम आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहोत. महाराष्ट्रातील कॉलेज युवांपासून ते तरुण पिढीपर्यंत सगळ्यांनाच आवडतील असे जोशपूर्ण, हलके-फुलके, आजच्या प्रेक्षकवर्गाला आपलेसे वाटणारे, चैतन्यपूर्ण असे कार्यक्रम झी युवावर बघायला मिळतील. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याच्या उद्देशातून झी युवा वाहिनी हि संकल्पना नावारूपाला आली. आजच्या तरुण पिढीला आवडणारे, त्यांच्या आयुष्याशी साधर्म्य साधणारे, प्रेरणा देणारे, उत्साहाने परिपूर्ण असे कार्यक्रम देण्याचा निश्चय घेऊन झी युवा वाहिनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. झी युवा वाहिनीवर अश्याप्रकारचे विषय हाताळणार आहे जे सध्याच्या मराठी वाहिन्यांवर बघायला मिळत नाही.
तेव्हा बघायला विसरु नका महाराष्ट्रातील टीव्ही बघण्याचा नाविन्यपूर्ण अनुभव देणारी वाहिनी झी युवा… नवे पर्व… युवा सर्व