News Flash

“तुम्हाला जळवण्यासाठी ही पोस्ट करतोय”; अभिनेत्यानं उडवली कंगनाची खिल्ली

शेतकरी आंदोलन: कंगना रणौत आणि दिलजीत दोसांजमधील वाद पोहोचला शिगेला

अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता दिलजीत दोसांज या दोघांमध्ये दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन ट्विटर वॉर सुरु झालं आहे. एकीकडे कंगना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करत आहे. तर दुसरीकडे दिलजीत शेतकऱ्यांना पाठिंबा देत कंगनावर निशाणा साधत आहे. या वादात आता अभिनेता जिशान अय्युब याने उडी घेत कंगनावर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. त्याने जळणाऱ्यांना जळू देत असं म्हणत त्याने दिलजीतसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

अवश्य पाहा – ‘तुझ्यासारखी चमचेगीरी करत नाही’; शेतकरी आंदोलनावरुन कंगना-दिलजितमध्ये जुंपली

“काही नाही केवळ तुम्हाला जळवण्यासाठी हा फोटो पोस्ट केला आहे. होय, हा आजच काढलेला फोटो आहे. दिलजीत पाजी आज तर फोटो काढायलाच हवा.” अशा आशयाचं ट्विट करुन जिशानने अप्रत्यक्षरित्या कंगनाला टोला लगावला आहे. यापूर्वी कुणाल कामरा, कुब्रा सैत, फराह खान, गिंपी गरेवाल, हिमांशी खुराना, स्वरा भास्कर, प्रकाश राज यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून दिलजीतची बाजू घेत कंगनावर टीका केली होती.

अवश्य पाहा – अक्षय-सलमानलाही सोडलं मागे; हे ठरले २०२० मधील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार

अवश्य पाहा – कंगनाची माघार? टीका करणाऱ्या अभिनेत्रीला ट्विटरवर केलं ब्लॉक

शेतकरी आंदोलन: ‘त्या’ आजींविषयी ट्विट करणं कंगनाच्या अंगलट

शेतकरी आंदोलनातील एक आजी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या असून अभिनेत्री कंगना रणौतने त्यांची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली आहे. त्यामुळे कंगनावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. कंगनाने अलिकडेच या आजींसदर्भातील एक ट्विट शेअर केलं होतं. मात्र, त्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. सोशल मीडियावर सुरु झालेल्या ट्रोलिंगनंतर कंगनाने तिचं हे ट्विट डिलीट केलं आहे. मात्र, सध्या ट्विटरवर #DaadiSeMaafiMangKangana हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 12:26 pm

Web Title: zeeshan ayyub diljit dosanjh vs kangana ranaut farmers protest in delhi mppg 94
Next Stories
1 “भावा तूच खरा रॉकस्टार'”; कंगनाविरुद्धच्या वादात बॉलिवूडनं दिला दिलजीतला पाठिंबा
2 #DiljitVsKangana: ‘कंगना को दिलजीत पेल रहा है’ विरुद्ध ‘कंगना रानौत शेरनी है’… मिम्समधून धम्माल टोलवाटोलवी
3 शेतकरी आंदोलनावर गप्प का? नेटकऱ्यांनी खिलाडी कुमारला विचारला प्रश्न
Just Now!
X