News Flash

Zero posters : ‘हमने तो चाँद को करिब से देखा है’

शाहरुखनं 'झिरो'मधल्या मुख्य अभिनेत्रींची ओळख करून दिली आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा या दोघींही प्रमुख भूमिकेत आहेत.

'झिरो'

‘बॉलिवूडचा बादशहा’ शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित असा ‘झिरो’ चित्रपट या वर्षाअखेरिस प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर २ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या दिवशी शाहरुखचा वाढदिवस आहे. त्यामुळे ‘झिरो’चा ट्रेलर ही शाहरुखनं आपल्या चाहत्यांसाठी दिलेली एक अनोखी भेट असणार आहे हे नक्की. पण तत्पुर्वी शाहरुखनं या चित्रपटाचे दोन महत्त्वाचे पोस्टर शेअर केले आहेत. हे पोस्टर शाहरुखच्या चित्रपटाविषयी अधिक कुतूहल चाहत्यांच्या मनात निर्माण करत आहेत.

एक स्वप्न आणि दुसरी आयुष्यातील अविभाज्य भाग असं म्हणत शाहरुखनं ‘झिरो’मधल्या मुख्य अभिनेत्रींची ओळख करून दिली आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा या दोघींही प्रमुख भूमिकेत आहेत. ‘सितारों के ख्वाब देखने वालो हमने तो चाँद को करिब से देखा है’ असं लिहित शाहरुखनं कतरिनासोबतचं पोस्टर शेअर केलं आहे.

तर दुसऱ्या पोस्टरमधून त्यानं अनुष्काची वेगळ्या पद्धतीनं चाहत्यांना ओळख करून दिली आहे. ‘इस पुरी दुनिया मै मेरी बराबरी की एक ही तो है’ असं लिहित अनुष्कासोबतचं दुसरं पोस्टर शाहरुखनं ट्विटरवर शेअर केलं आहे.

येत्या २१ डिसेंबरला हा चित्रपट देशभरातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 9:10 am

Web Title: zero posters katrina kaif in a romantic pose srk and anushka sharma in a jovial mood
Next Stories
1 २५ पैसे भरपाई मागत राखी सावंतचा तनुश्रीविरोधात मानहानीचा दावा
2 ‘विकी डोनरमधल्या किसिंग सीनमुळे पत्नी झाली होती नाराज’
3 ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’चे तिकीट दर वाढणार?
Just Now!
X