बॉलीवूडचा यंदाचा बहुचर्चित चित्रपट ‘धूम ३’ त्याचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून अधिक चर्चेत आहे. चित्रपटातील गाणी, स्टंट आणि आमिर-कतरिनाची अनोखी जोडी यांनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तसेच, ‘धूम ३’ च्या चित्रपटकर्त्यांनी युट्यूबवर चित्रपट आणि चित्रीकरणाशी निगडीत व्हिडिओ एका पाठोपाठ एक प्रसिध्द करण्याचा धडाका लावला आहे. चाहत्यांची या व्हिडिओंना पसंती देखील मिळत आहे. नुकताच आमिरच्या ‘टॅप डान्स’चा व्हिडिओ प्रसिध्द करण्यात आला होता. त्यांनतर आता कतरिनावर चित्रीत करण्यात आलेल्या ‘कमली’ या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.
पाहा : ‘धूम ३’साठी आमिरचा ‘टॅप डान्स’ शिकतांनाचा व्हिडिओ
या गाण्यात कतरिनाने हॉट शॉर्टस्, पांढरे शर्ट आणि गुडघ्यापर्यंत असे लेदर बूट परिधान केले आहेत. या उडत्या गाण्यात कतरिनाच्या नृत्य कौशल्याबरोबच तिने केलेल्या काही स्टंट्सचीही झलक पाहावयास मिळते. ‘कमली’ हे गाणे सुनिधी चौहानने गायले असून, त्यास प्रितमचे संगीत आहे.