तुम्हाला २००२ मध्ये आलेला ‘काटें’ सिनेमा आठवतोय का? या सिनेमातील संजय दत्तची व्यक्तिरेखा कोणीही विसरु शकत नाही. या सिनेमातील एक प्रसिद्ध गाणे म्हणजे ‘सिगरेट के धुएं का छल्ला बना कर…’. या गाण्यात संजय फार सिगारेट ओढताना दिसतो. फक्त याच सिनेमात नाही तर अनेक सिनेमांमध्ये संजय सिगारेट ओढताना दिसतो. हे तर झाले सिनेमांचे पण तुम्हाला माहिती आहे का की खऱ्या आयुष्यात संजय वयाच्या दहाव्या वर्षांपासून सिगारेट ओढायला लागला होता. तो वडिलांपासून लपून सिगारेट ओढायचा.
हे आम्ही नाही तर खुद्द संजयनेच मान्य केले आहे. संजूबाबाने एका टीव्ही शोदरम्यान हा किस्सा सांगताना वडील सुनील दत्त आणि बहिण प्रियांका दत्त समोर होत्या. तो म्हणाला की, ‘घरी एकदा पार्टी सुरू होती. वडिलांचे काही मित्र आले होते. त्या लोकांनी ओढून अर्धवट फेकलेली सिगारेट मी तिथेच झोपून ओढायचो. तेव्हा मी १० वर्षांपेक्षाही कमी वयाचा होतो.’
त्यानंतर मला बोर्डिंग स्कुलमध्ये टाकले. त्याच्या वडिलांच्या मते, ‘संजयचे घरी फारच लाड व्हायचे. यामुळेच तो बिघडेल याची त्यांना काळजी वाटत होती, म्हणून त्यांनी संजयला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला.’