शंभर वर्षांपेक्षा जास्त मोठय़ा असलेल्या चित्रपटसृष्टीत कुठल्या ना कुठल्या मोठय़ा चित्रपटाने वीस वर्षे, पन्नास वर्षांचा टप्पा गाठलेला आहे. तरीही काही चित्रपटांची नावे, त्यांचे हे वर्षांगणिक जुने होत जाणे साजरे करण्यासारखेच असते. असाच प्रकार करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाबाबत म्हणता येईल. सध्या धर्मा प्रॉडक्शनचा सर्वेसर्वा आणि इंडस्ट्रीतही सगळ्यांचा लाडका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करण जोहरच्या दिग्दर्शकीय कारकीर्दीचा शुभारंभ करणारा हा चित्रपट होता. त्यामुळे हा चित्रपट सर्वार्थाने करण जोहरसाठी महत्त्वाचा चित्रपट आहे. या चित्रपटाची वीस वर्षे पूर्ण होणे हा म्हणूनच त्याच्यासाठी एक मोठा सोहळा ठरला. यानिमित्ताने, चित्रपटातली मुख्य तिकडी शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी आणि खुद्द करण जोहर ही मंडळी एकाच व्यासपीठावर एकत्र आली आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाच्या आधी करण जोहर निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहात होता. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा आदित्य चोप्रा दिग्दर्शित चित्रपट, या चित्रपटाच्या निमित्ताने करणची शाहरुख खान, काजोल यांच्याशी घट्ट मैत्री जमली होती. मात्र करणपेक्षाही त्याचे वडील यश जोहर यांच्यामुळे आपण ‘कु छ कुछ होता है’ हा चित्रपट स्वीकारला, असं शाहरुखने या वेळी बोलताना सांगितले. शाहरुखने यश जोहर यांच्याबरोबर काम केले होते. त्यांनी ‘डुप्लिकेट’ हा चित्रपट केला, मात्र तो फारसा चालला नाही. अशा अनेक वेगळ्या संकल्पना आणि त्यावरचे चित्रपट यश जोहर यांच्या डोक्यात घोळत असायचे. त्यातले अनेक चित्रपट कधीच कॅ मेऱ्यासमोर येऊ शकले नाहीत. ते चित्रपट यायला हवेत, अशी इच्छाही त्याने व्यक्त केली. ‘दिलवाले..’च्या वेळी करणशी गप्पा मारताना त्याच्या बोलण्यातून त्याच्याकडे हुशारी आहे, दिग्दर्शनाचे एक तंत्र आहे हे लक्षात आले होते. त्यामुळे करणबरोबर चित्रपट करायची इच्छा यश जोहर यांच्याकडेही आपण बोलून दाखवली होती, असे त्याने सांगितले. अखेर, महेश भट्ट यांच्याबरोबर ‘चाहत’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना करण आपल्याकडे ‘कुछ कुछ होता है’ची पटकथा घेऊन आला. त्या वेळी करण खूप काही सांगण्याच्या प्रयत्नात होता, पण कथेच्या नावाखाली त्याच्याकडे फारसे काही सांगण्यासारखे नव्हते, अशी त्याची थट्टाही शाहरुखने केली. पण अभिनेता म्हणून आजवर आपल्याला कधीच पटकथा हा प्रकार समजलेला नाही. मी नेहमी पटकथेपेक्षा ती लिहिणारा किंवा पडद्यावर आणू पाहणाऱ्या दिग्दर्शकाचे मन समजून घ्यायचा प्रयत्न करतो, त्याला काय सांगायचेय हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो, असे सांगत ‘कुछ कुछ होता है’ हाही त्यातल्या कथेपेक्षाही करणची हुशारी, त्याच्याबरोबर काम करायची इच्छा अशाच गोष्टींमुळे घेतल्याचे त्याने सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 years of kuch kuch hota hai
First published on: 21-10-2018 at 01:32 IST