अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांबरोबर काम केलेले ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार ए. आर. रेहमान ब्राझिलियन गीतकार आणि गायिक अॅना बिट्रिझबरोबर काम करत आहे. पेले या चित्रपटासाठी हे दोघे एकत्र आले आहेत. अॅना बिट्रिझ या अतिशय उत्कृष्ट ब्राझिलियन गीतकार आणि गायिकेबरोबर पेले चित्रपटासाठी काम करत असल्याचे टि्वट रेहमान यांनी पोस्ट केले आहे. महान ब्राझिलियन फुटबॉलपटू पेले यांच्या जीवनावर याच नावाने चित्रपट बनत आहे. जेफ झिंबालिस्ट आणि मायकल झिंबालिस्ट दिग्दर्शित या चित्रपटात केव्हिन डे पॉल, व्हिंसेंट डिऑनॉफ्रिओ, रॉड्रिगो सांट्रॉ, डएगो बोनेटा आणि कॉल्म मेनये यांच्या भूमिका आहेत.