ऑस्कर पुरस्कार विजेता ए.आर.रहमानने २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘गुरु’ चित्रपटाला संगीत दिले होते. आता, ‘गुरु’मधील ऐश्वर्या-अभिषेकवर चित्रीत केलेले ‘तेरे बिना’ हे गाणे डिस्नी ३ डी अॅनिमिटेड चित्रपट ‘प्लेन्स’मध्ये ऐकण्यास मिळणार आहे. ‘प्लेन्स’चा संगीत समन्वयक फ्रान्सिस देब्बाने गाण्याची निवड केली असून सोनी म्युझिक एंटरटेन्मेंट इंडियाने याचा परवाना घेतला आहे.
प्रेमाचे प्रतिक मानल्या जाणा-या भारतातील ताजमहल येथून प्लेन जात असतानाच्या प्रणयदृश्यामध्ये हे गाणे ऐकू येणार आहे. डिस्नीचा ‘प्लेन्स’ हा चित्तथरारक चित्रपट म्हणजे एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प असून, प्रियांकाने यात लक्षवेधक अशा अ‍ॅनिमेटेड रेसिंग प्लेनसाठी आपले योगदान दिले आहे. चित्रपटात प्रियांकाने आवाज दिलेली ‘इशानी’ (विमान) ही भारतीय आहे. तर, हॉलिवूड अभिनेता डॅनने ‘डस्टी चॉपरला’ आणि हॉलिवूड अभिनेत्री टेरी हॅचरने ‘डोट्टी’ ला आपला आवाज दिला आहे.