स्टार प्रवाहवरील मालिका ‘आई कुठे काय करते’ सुरुवातीपासून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाल्याचं दिसतं. एक हाऊसवाइफ ते स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहत आर्थिकरित्या सक्षम झालेल्या अरुंधतीचा प्रवास प्रेक्षकांना खूप आवडला. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत या मालिकेला भरभरून प्रेम दिलं आहे. सध्या ही मालिका एका नव्या आणि निर्णयक वळणावर आली आहे. पण यासोबतच मालिकेतील मुख्य अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर म्हणजेच अरुंधतीने मालिका सोडल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.

नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रसारित झाला आहे. त्या प्रोमोमध्ये अनिरुद्ध आणि संजना यांच्यासोबत घरातील इतर सदस्य दिसत आहेत मात्र अरुंधतीचा कोणताही सीन नाहीये. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अरुंधतीनं म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरनं काही वैयक्तीक कारणासाठी मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक घेतला असल्यानं मेकर्सनी आता अनिरुद्ध आणि संजनावर फोकस केलं आहे.

दरम्यान मालिकेमध्ये अरुंधती दिसत नसल्यानं तिने मालिका सोडली की काय असा संभ्रम प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला होता. सोशल मीडियावर अशा चर्चा देखील सुरू होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हिडीओ –

मात्र मधुराणीनं ही मालिका सोडली नसून तिने काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेतला आहे. या ब्रेकनंतर ती पुन्हा शूटिंगला सुरुवात करणार आहे. या मालिकेत मधुराणी प्रभुलकर आईची म्हणजेच अरुंधतीची भूमिका साकारत असून तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.