अखेर अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाला, अरुंधती सोडणार देशमुखांचे घर!

२५ वर्षांचा संसार पाठी टाकत अरुंधतीने केली नवीन प्रवासाला सुरुवात…

aai kuthe kay karte
अखेर अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाला

छोट्या पडद्यावरची ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून अनिरुद्ध आणि अरुंधती देशमुख यांचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे आता ही मालिका एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचली आहे. आता अनिरुद्ध आणि अरुंधती कायदेशीररित्या एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. एवढंच नाही तर अनिरुद्धसोबत घटस्फोट झाल्यानंतर अरुंधतीने देशमुखांच घर देखील सोडलं आहे.

घटस्फोटाच्या दिवशी आपलं सगळं सामान आवरून, २५ वर्षांच्या त्यांच्या संसाराच्या आठवणी सगळ्या आठवणी अरुंधतीला येत होत्या. आता या सगळ्या आठवणी मागे टाकत अरुंधती तिच्या आयुष्यात पुढे निघाली आहे. तिच्या आठवणींची शिदोरी घेऊन आई पुन्हा एकदा तिच्या माहेरी कायमची निघाली आहे. आपल्या मुलीचा २५ वर्षांचा भरला संसार मोडताना पाहून अरुंधतीच्या आईला देखील दुःख झालं. आपल्या मुलीची ही अवस्था पाहून आई देखील पूर्णपणे कोलमडून गेली होती.

आणखी वाचा : प्रियांका अमेरिकावासियांना खाऊ घालतेय ‘मुंबईचा वडापाव’, किंमत ऐकून पळून जाईल भूक

आणखी वाचा : पॉर्न चित्रपटाच्या ६ तासांच्या चित्रीकरणासाठी ‘नॅंसी भाभी’ घ्यायची इतके रुपये; कमाईचा आकडा ऐकून व्हाल थक्क

या मालिकेत सध्या यशच्या साखरपुड्याचा सोहळा सुरु होता. या आनंदाच्या निमित्ताने घरातील सर्वजण एकत्र जमले होते. इतकंच नाही तर, १५ वर्षांपासून दूर असलेला अनिरुद्धचा भाऊ अविनाश देखील ‘समृद्धी’ बंगल्यात परतला होता. घरात एकीकडे आनंदाचा सोहळा सुरु असताना मात्र, दुसरीकडे अनिरुद्धला वकिलांचा फोन येतो आणि घटस्फोटाची तारीख मिळाल्याचे सांगतो. एकीकडे उत्साह असताना आता दुसरीकडे या वाईट बातमीने संपूर्ण देशमुख कुटुंब हादरून जात. मात्र, या वेळीही अरुंधती आपल्या निर्णयावर ठाम होती आणि अखेर तिने अनिरुद्धला घटस्फोट दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aai kuthe kay karte marathi serial update arundhati and aniruddh deshmukh gets divorce dcp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या