छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मराठी मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत असलेल्या सगळ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचे दिसते. नुकतंच मिलिंद गवळी यांनी या मालिकेत अप्पांची भूमिका साकारणारे अभिनेते किशोर महाबोले यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. मात्र आता त्यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावरुन डिलीट केला आहे.

मिलिंद गवळी यांनी या व्हिडीओत त्यांनी आप्पा म्हणजेच अभिनेते किशोर महाबोले यांच्याविषयी भरभरुन लिहिले होते. या व्हिडीओनंतर आप्पांचे सोशल मीडियावर विशेष कौतुकही केले जात होते. या व्हिडीओत आई कुठे काय करते या मालिकेचा सेटवर अनेक गमतीजमती पाहायला मिळत होत्या. मिलिंद यांनी या व्हिडीओला हटके कॅप्शनही दिले आहे.

Virat-Gautham interaction video goes viral
KKR vs RCB : भाईचारा ऑन टॉप! विराट-गंभीर एकमेकांशी संवाद साधतानाचा नवीन VIDEO व्हायरल
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?
supriya sule interview
बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ सामना; सुप्रिया सुळेंसमोरील आव्हान मात्र वेगळंच

आणखी वाचा : “दिघे साहेबांना भेटायचं भाग्य मला दोन वेळा लाभलं…”, ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धने सांगितल्या खास आठवणी

मिलिंद गवळींची पोस्ट

‘आप्पांच्या अंगात ताप होता, अंगात कणकण होती, थकवा आला होता, त्यांना बसता सुद्धा येत नव्हतं. त्यांना खूपच त्रास होत होता, गोळ्या औषध घेऊन सुद्धा दोन-तीन दिवस तो ताप उतरत नव्हता, कणकण थांबत नव्हती. पण ते शूटिंग करत होते कारण एपिसोड जायचा होता. आपण शूटिंग केलं नाही तर एपिसोड अडकेल. ‘आई कुठे काय करते’ यशस्वी होण्याचं एक कारण हे पण आहे की कलाकार जीव ओतून काम करतात. आपल्या कामावर अतोनात प्रेम करतात’.

काही महिन्यांपूर्वी किशोरजी एक सीन करत होते आणि त्यांच्या घरून फोन आला की त्यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. सोलापूरला लगेच निघावं लागणार आहे. डायरेक्टर रवी करमरकर म्हणाले की आप्पा तुम्ही ताबडतोब निघा. पण आप्पांनी सीन पूर्ण करायचा निर्णय घेतला. वडिलांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर एक विनोदी सीन करणं किती यातना देणारं असू शकतं याची कल्पना करणं खूप कठीण आहे.

या पावणेतीन वर्षांमध्ये बहुतेक सगळ्या कलाकारांनी आणि ‘आई कुठे काय करते’च्या टीम ने शारीरिक, मानसिक, कौटुंबिक समस्या बाजूला ठेवून खूप कठीण परिस्थितीमध्ये शूटिंग पूर्ण केलं आहे. बरं या गोष्टींचा बाऊ न करता, त्याची सहानुभूती न घेता, हे जे काय काम आहे ते प्रामाणिकपणे करत राहणे, कामालाच महत्त्व देत राहाणे. आपल्यामुळे ८० लोकांच्या युनिटला त्रास होऊ नये, त्यांचं नुकसान होऊ नये, हे एक खूप महत्त्वाचं कारण असतं. हे सगळं हसत खेळत मस्ती करत चाललेलं असतं. हा जो बीटीएस BTS मी शूट केला आहे त्याच्याने तुम्हा प्रेक्षकांना थोडासा अंदाज येईल.’ दुनिया मे रहना है तो काम कर प्यारे…., असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “जर अनिरुद्ध सुधारलेला असेल तर…”, ‘आई कुठे काय करते’मधील मिलिंद गवळींची खास पोस्ट

दरम्यान मिलिंद गवळी हे अनेकदा सेटवरचे विविध व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्यांच्या या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘तुम्ही भारी आहात’, ‘कमाल’, ‘म्हणून आम्ही एकही एपिसोड मिस करत नाही’ अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.