scorecardresearch

“दिघे साहेबांना भेटायचं भाग्य मला दोन वेळा लाभलं…”, ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धने सांगितल्या खास आठवणी

नुकतंच मिलिंद गवळी यांनी या चित्रपटासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मराठी मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत असलेल्या सगळ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. नुकतंच मिलिंद गवळी यांनी या चित्रपटासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे. याच निमित्ताने मिलिंद गवळी यांनी धर्मवीर चित्रपटासाठी आणि प्रसाद ओकसाठी खास पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी धर्मवीर चित्रपटाच्या ट्रेलरचा व्हिडीओ शेअर केला आहे.

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटासाठी अंकुश चौधरीची निवड का केली? केदार शिंदेंनी दिले स्पष्ट शब्दात उत्तर

मिलिंद गवळींची खास पोस्ट

“प्रसाद ओक तुझं खूप खूप कौतुक, तुझं खूप खूप अभिनंदन, वीस पंचवीस वर्षांपूर्वी आपण दोघांनी केलेल्या “ अथांग “नावाच्या सिरीयल पासून ते आत्ता धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या भूमिके पर्यंतचा तुझा प्रवास मी पाहिला आहे , खूपच कौतुकास्पद , यशस्वी आहे तो, very inspiring as well, आपला मित्र इतकं कसं छान काम करतो , याचा अभिमान वाटतो , दिग्दर्शन असो किंवा अभिनय असो तू अप्रतिमच काम करतोस. मागच्या आठवड्यात चंद्रमुखी पाहिला , इतका अप्रतिम सिनेमा फार दिवसात बघितला नव्हता आणि आता तर काय धर्मवीर सिनेमा उद्या रिलीज होतोय, पण तो रिलीज व्हायच्या आधीच सुपर-डुपर हिट झालाय असं तू समजच.

कारण आनंद दिघे साहेबांना भेटायचं भाग्य मला दोन वेळा लाभलं होतं , आपल्या समाजामध्ये हिरो कोणाला म्हणावं , आदर्श कोणाला मानावं तर आनंद दिघे साहेब हे उत्तम उदाहरण आहेत आणि तू हुबेहूब आनंद दिघे साहेबांचा सारखा दिसला आहेस ( Actor Ben Kingsley Gandhi film दिसला तसा) तुझ्या अभिनयाची उंची मला माहिती आहे त्यामुळे सिनेमा अप्रतिमच असणारच, खूप खूप खूप शुभेच्छा मित्रा . माझे मित्र प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई तुमचा सुद्धा खूप अभिमान वाटतो, हा विषय निवडला आणि त्याला तुम्ही न्याय दिलात , धर्मवीर जा संपूर्ण टीमला माझा सलाम आणि शुभेच्छा”, असे मिलिंद गवळी म्हणाले.

उर्मिलासोबत बिनसलेल्या नात्यावर आदिनाथ कोठारेने सोडले मौन, म्हणाला “आमच्या दोघात…”

दरम्यान ‘धर्मवीर’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आज १३ मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aai kuthe kay karte fame milind gawali aka aniruddha special post for dharmveer movie prasad oak in anand dighe nrp

ताज्या बातम्या