scorecardresearch

आमिर खानच्या मुलगी इरा आहे गंभीर आजाराने ग्रस्त, म्हणाली “यापूर्वी कधीही मला…”

या एंग्जायटी अटॅकमुळे इराला विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. अनेकदा ती तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. आमिर खानची मुलगी इराला गंभीर आजार झाला आहे. सध्या तिला एंग्जायटी अटॅक येत असल्याचे माहिती तिने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. या एंग्जायटी अटॅकमुळे इराला विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

इरा खान हिने नुकतंच इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात इराने तिच्या स्वत:चा एक मिरर सेल्फी पोस्ट केला आहे. तिचा हा सेल्फी एंग्जायटी अटॅक आल्यानंतर अंघोळ करुन झाल्यानंतरचा आहे. यासोबत तिने मोठी पोस्टही लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने तिला एंग्जायटी अटॅक येत असल्याचे सांगितले आहे.

Chandramukhi box office collection : ‘चंद्रमुखी’तील चंद्रा आणि दौलतरावची प्रेक्षकांना भुरळ, पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

इरा खानची संपूर्ण पोस्ट

“मला आता एंग्जायटी अटॅक येत आहेत. मला कधी कधी प्रचंड भीती वाटते तर कधी मी फार जास्त उत्साही असते. अचानक मध्येच मला फिट्सही येतात. पण यापूर्वी कधीही मला एंग्जायटी अटॅक आलेले नव्हते. हा पॅनिक विरुद्ध पॅनिक आणि एंग्जायटी विरुद्ध एंग्जायटी अटॅक यातील मोठा फरक आहे. एंग्जायटी अटॅकमध्ये अचानक तुमच्या हृदयाची धडधड वाढणे, श्वासाची गती वाढणे आणि रडणे ही शारीरिक लक्षणे जाणवतात. दर दिवशी, हळूहळू हे सर्व वाढत जाते. काहीतरी भयंकर घडणार आहे, असे सतत वाटत राहते.

पॅनिक अटॅक कसा असतो हे मला माहित नाही. ही खूप भीतीदायक वाटत आहे. माझ्या थेरपिस्टने मला सांगितले की जर ते अॅटक दररोज येत असतील तर तू डॉक्टरांना किंवा थेरपिस्टला सांगा. तुम्हाला कसं वाटतंय, तुम्ही काय विचार करताय याबाबत ते तुम्हाला मदत करतील. पण मला खरंच फार लाचार असल्यासारखे वाटत आहे. कारण मला खरोखर झोपायचे आहे. पण मला झोप येत नाही. याचे प्रमुख कारण एंग्जायटी अटॅक आहे. हे विशेषतः रात्री घडते. मी माझी भीती ओळखण्याचा प्रयत्न करते. अनेकदा स्वतःशीच बोलते, पण एकदा का तो अॅटक आला की ते थांबायचे नावच घेत नाही. पण या काळात बॉयफ्रेंडशी बोलण्याने मला खूप मदत होत आहे. काही तास तरी मला रिलॅक्स वाटते. मी यासाठी कोणावरही अवलंबून राहू नये, यासाठी मी ते कमी करण्याचा प्रयत्न करत आहे”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आयुष्यमान खुरानाच्या पत्नीनं शेअर केले बेडरुम सीक्रेट्स, शरीरसंबंधांवर ताहिराचा खुलासा

इरा खानने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये एक व्हिडीओ शेअर केला होता. यात तिने ती गेल्या ५ वर्षांपासून क्लिनिकल डिप्रेशनची झुंज देत आहे, असे सांगितले होते. हा आजार झालेली व्यक्ती अनेक दिवस उदास राहते. तिला एकटेपणा जाणवतो. इरा ही नेहमी मानसिक आरोग्याबद्दल बोलते. इरा खान ही आमिर खानची पहिली पत्नी रिनाची मुलगी आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aamir khan daughter ira khan battling anxiety attacks says it feels like impending doom cannot sleep even if i want to also suffered from depression nrp