आमिर खान-किरण राव घटस्फोट : मुलगी इरा खानची पहिली पोस्ट; म्हणाली…

जवळपास १५ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर आमिर आणि किरणने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

aamir khan, ira khan, aamir khan kiran rao, Aamir Khan divorce announcement, Ira Khan Instagram, ira khan confusing post, aamir khan kiran rao beakup,
इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सेल्फी शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली. जवळपास १५ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. आता आमिर खानची मुलगी इरा खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

इरा खान ही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. आमिर आणि रीना यांच्या घटस्फोटानंतरही इराचे वडिलांसोबत चांगले बाँडिंग आहे. ती बऱ्याच वेळा सावत्र आई किरण राव आणि आमिर खान यांच्यासोबत वेळ घालवताना दिसत होती. वडील आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाच्या निर्णयानंतर काही वेळातच इराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

आणखी वाचा : अडल्ट फिल्म पाहात असताना मावशी आली अन्…; विक्रांत मेस्सीने सांगितला किस्सा

aamir khan, ira khan, aamir khan kiran rao, Aamir Khan divorce announcement, Ira Khan Instagram, ira khan confusing post, aamir khan kiran rao beakup, Aamir Khan Daughter,

इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सेल्फी शेअर केला आहे. या फोटोवर तिने ‘पुढचा रिव्ह्यू उद्या! पुढे काय होणार आहे?’ असे म्हटले आहे. इराने ही पोस्ट कोणासाठी केली आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ती नक्की कोणाविषयी बोलत आहे? हे देखील इराने पोस्टमध्ये सांगितलेले नाही.

स्टेटमेंटमध्ये काय म्हणाला आमिर?
“१५ वर्षांच्या सुंदर संसारात आम्ही हसत-खेळत प्रत्येक क्षण घालवला आहे. यादरम्यान आमचे नाते, विश्वास आणि सन्मानाने पुढे जात राहिले. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु करत आहोत. जिथे आम्ही पती-पत्नी नसून फक्त आमच्या मुलाचे पालक असू आणि कुटुंबाचे एक भाग असू. काही दिवसांपूर्वीच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही वेगवेगळे राहण्यात समाधानी आहोत. आझादसाठी आम्ही त्याचे पालक असून त्याचा उत्तमपणे सांभाळ करू” असे आमिर आणि किरण या स्टेटमेंटमध्ये म्हणाले आहेत.

पुढे या स्टेटमेंटमध्ये ते म्हणाले, “मुलाचा सांभाळ करण्यासोबत आम्ही फिल्म, पाणी फॉउंडेशन आणि आम्हाला आवडत असलेल्या इतर अनेक प्रोजेक्टवर पुढेही एकत्र काम करू. आम्हाला समजून घेत आमच्या या निर्णयात आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आमच्या कुटुंबियांचे आणि मित्र परिवाराचे आभार.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aamir khan daughter ira khan post after kiran rao and aamir divorce announcement avb