ताटाच्या एका कोपऱ्यात असलेला मुरांबा संपूर्ण जेवणाची चव बदलतो. आंबट-गोड असा हा मुरांबा कोणाला आवडत नसेल तर नवलचं. या मुरांब्यांच्या चवीप्रमाणेच काहीशी नातीदेखील असतात. नातेसंबंधांमधील आंबट-गोडवा घेऊन ‘मुरांबा’ हा नवा मराठी चित्रपट उद्या २ जूनला प्रदर्शित होत आहे. या मुरांब्याची भुरळ आता बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खानलाही Aamir khan पडली आहे.
वाचा: मुव्ही रिव्ह्यू- तरुणाईच्या कलानं, प्रौढांच्या ‘दिला’नं विचारपूर्वक मुरवलेला ‘मुरांबा’
सलमान खान, अजय देवगणनंतर आता आमिरनेही मराठी चित्रपटाचा ट्रेलर ट्विट केला आहे. याआधी सलमानने ‘एफयू’ तर अजय देवगणने ‘हृदयांतर’ चित्रपटाचा ट्रेलर ट्विट केला होता. तर आता आमिरने ‘मुरांबा’ muramba चित्रपटाचा ट्रेलर ट्विट केलाय. ‘नुकताच हा मनोरंजक ट्रेलर पाहिला. तुम्हीही बघा,’ असे त्याने ट्विट केले आहे. आमिरला हा ट्रेलर आवडलाय यात शंका नाही. पण केवळ ट्रेलरवरच न थांबता तो हा चित्रपट पाहतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
https://twitter.com/aamir_khan/status/870208926284992512
वेब क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली मिथिला पारकर mithila palkar , अमेय वाघ amey wagh , चिन्मयी सुमित आणि सचिन खेडेकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. रिलेशनशिप, करिअर, कामाच्या संधी, संधी मिळवण्यासाठी सुरु असणारी धडपड, संधी मिळाल्यावर स्वत:ला सिद्ध करण्यासाठीची धडपड आणि त्यातूनच कुटुंबियांचं ‘बुमरॅंग’प्रमाणे सर्रकन येणं… त्याच वेगाने निघून जाणं हे जणू आजच्या तरुणाईसाठी सरावाचच झालं आहे. यावरच दिग्दर्शक वरुण नार्वेकरचा हा चित्रपट आधारित आहे. मुलांचं रिलेशनशिप स्टेटस जेव्हा पालकांसमोर येतं आणि मुलांच्या जीवनातील या टप्प्याचा पालक त्यांच्यापरिने कसा स्वीकार करतात याचं प्रत्ययकारी चित्रण वरुणने चित्रपटातून मांडलं आहे.