सलमान सोबतचा फोटो शेअर केल्याने AAP चा मंत्री होतोय ट्रोल, चाहत्यांनी विचारलं, “Big Boss मध्ये…”

त्यांच्या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

aap, aap party, salman khan, raghav chadha, bigg boss 15, bigg boss,

आम आदमी पक्षाचे मंत्री राघव चड्ढा यांनी नुकतीच सलमान खानची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सलमानसोबत एक फोटो काढला. हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण या फोटोमुळे राघव यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

राघव चड्ढा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमानने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. तर राघव यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे आणि त्यावर जॅकेट घातले आहे. तसेच फोटोमध्ये मागे सलमानचा बॉडीगार्ड शेरा देखील दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘एक मुलाकात सलमान खान भाई के साथ’ असे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : ‘त्याच्या वडिलांनी यश राज फिल्म्सला २० कोटी रुपये दिले होते’, अभिनेत्याचा रणवीरच्या पदार्पणासंदर्भात धक्कादायक दावा

राघव आणि सलमान यांच्या भेटीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे त्यांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे. या फोटोवर एका यूजरने ‘बिग बॉसमध्ये एण्ट्री करण्याची तयारी सुरु आहे का?’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने दोघांच्या लूकची प्रशंसा केली आहे.

सलमानचा नुकताच ‘अंतिम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. त्यासोबतच सलमान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १५’चे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aap party member raghav chadha share photo with salman kha and get trolled avb

ताज्या बातम्या