अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अभिषेक चाहत्यांच्या संपर्कात राहतो. एवढंच नाही तर अभिषेक अनेकदा ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसतो. दरम्यान, अभिषेकने स्वत: वरचं एक मीम सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिषेकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे मीम शेअर केलं आहे. ड्रेकच्या लोकप्रिय मीम्स सारखे हे एक मीम अभिषेकने शेअर केलं आहे. ३० जून बुधवारी अभिषेकने सोशल मीडिया दिनानिमित्त त्याने स्वत: वरचं एक मीम शेअर केलं. त्यात अभिषेकने स्टॅन लीच्या स्पायडरमॅन कॉमिक मधील पीटर पार्करमधील आयकॉनिक वाक्य कोट केलं आहे. यात सोशल मीडिया कशासाठी वापरतात हे अभिषेकने सांगितले आहे. ‘सोशल मीडिया अफवा आणि नकारात्मक गोष्टी नाही तर माहिती पुरवण्यासाठी आहे’, असे अभिषेकने त्या फोटोत सांगितले आहे. तर हे मीम शेअर करत “सोशल मीडिया एक शक्तिशाली साधन आहे. पण लक्षात ठेवा, मोठ्या सामर्थ्यांसोबत मोठी जबाबदारी येते!”, असे स्टॅन लीच्या स्पायडरमॅन कॉमिक मधील पीटर पार्करमधील आयकॉनिक वाक्य अभिषेकने कॅप्शन म्हणून दिले आहे.

आणखी वाचा : फरहान अख्तरच्या ‘तुफान’चा ट्रेलर प्रदर्शित

आणखी वाचा : सीतेच्या भूमिकेसाठी मानधनाची रक्कम वाढवलेल्या करीनाची पाठराखण करत तापसी म्हणाली…

अभिषेकने हे मीम सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट करत त्याच्या विनोदाची स्तुती केली आहे. अभिषेकचे लाखो चाहते आहेत. अभिषेक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek bachchan share a meme on his pictures and tells right usage of social media dcp
First published on: 01-07-2021 at 10:32 IST