मराठी नाटक, मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून अभिनेते अजय पुरकर यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘पावनखिंड’ चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेली बाजीप्रभू देशपांडे ही भूमिका तर प्रचंड गाजली. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. आता अजय यांनी एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे. कलाक्षेत्रात बरीच वर्ष काम केल्यानंतर त्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा – नितीन गडकरींनी घेतली अमिताभ बच्चन यांची भेट, व्हायरल फोटोंमधील एका गोष्टीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

अजय यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अभिनयाबरोबरच ते आता निर्मिती क्षेत्रातही काम करताना दिसतील. जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेची त्यांनी स्थापना केली आहे. या संस्थेद्वारा नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका यांची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच विविध ओटीटी प्लॅटफॉर्मसाठीसुद्धा चित्रपट आणि मालिका यांची निर्मिती होणार आहे.

पाहा व्हिडीओ

अजय म्हणाले, “गेली अनेक वर्ष रसिक प्रेक्षकांनी माझ्यावर माझ्या भूमिकांवर प्रेम केलं. त्याचीच पुण्याई आज माझ्या वाट्याला आली आहे. कित्येक दिवस एक कल्पना माझ्या डोक्यात होती. काल (१९ ऑगस्ट) जन्माष्टमीच्या मुहुर्तावर मी माझं प्रॉडक्शन हाउस म्हणजेच निर्मिती संस्था स्थापन केली आहे. जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्स असं त्याचं नाव आहे. उत्तमोत्तम कलाकृती कशाप्रकारे प्रेक्षकांसमोर आणता येतील याचा विचार करणारी ही निर्मिती संस्था असेल. त्यासाठीच मी या संस्थेची स्थापना केली आहे.”

आणखी वाचा – आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’चं १०० कोटींचं नुकसान? तर अक्षयचा ‘रक्षाबंधन’ही बॉक्स ऑफिसवर ठरला सुपरफ्लॉप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजय यांनी ही घोषणा करताच अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तम कलाकृती रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी अजय आता आणखीन मेहनत करताना दिसणार आहेत. याआधी ‘असंभव’, ‘अस्मिता’, ‘तू तिथे मी’, ‘मुलगी झाली हो’ अशा अनेक मालिका तसेच ‘कोडमंत्र’, ‘नांदी’ यांसारखी उत्कृष्ट आणि वेगळ्या विषयांवरची नाटके आणि ‘बालगंधर्व’, ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘पावनखिंड’ यांसारखे चित्रपट करत प्रेक्षकांना आपलंस केलं आहे.