बॉलिवूड चित्रपटांमध्ये लोकप्रिय असलेले कॉमेडियन आणि अभिनेते मुश्ताक मर्चंट यांचे निधन झाले आहे. मुश्ताक मर्चंट यांचे आज २७ डिसेंबर रोजी मुंबईतील होली फॅमिली रुग्णालयात निधन झाले आहे. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून मधुमेहाशी लढा देत होते.
मुश्ताक यांनी १६ वर्षांपूर्वी अभिनय सोडला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:ला धार्मिक कामात व्यस्त केले. त्यांचं अंतिम संस्कार हे पूर्ण धार्मिक परंपरेने केले जाणार आहे.
मुश्ताक यांनी बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात ‘हाथ की सफाई’, ‘सीता और गीता’, ‘जवानी दीवानी’, ‘सागर’, ‘प्यार का साया’ आणि ‘फिफ्टी फिफ्टी’ हे चित्रपट आहेत. एवढचं काय तर त्यांनी बॉलिवूडमधला सगळ्यात आयकॉनिक चित्रपट शोलेमध्ये काम केले आहे. पण चित्रपट एडिट करत असताना त्यांचा रोल हा कापण्यात आला होता.