टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या पत्नी आणि मुलाबद्दल बोलत आहे. तो म्हणत आहे की, त्याने एक निर्णय घेतला आहे आणि हा त्याच्यासाठी सर्वांत कठीण निर्णय आहे. अर्जुन म्हणाला की, तो वेगळा मार्ग निवडत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही चाहते खूप नाराज झाले आहेत

अर्जुन बिजलानीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या चेहऱ्यावर गंभीरता दिसून येते. या व्हिडीओबरोबर त्याने दोन तुटलेले हार्ट इमोजी टाकले आहेत. व्हिडीओमध्ये अर्जुन बिजलानी म्हणतो, “आयुष्यात जेव्हा जेव्हा काही घडते, तेव्हा तेव्हा मी ते नेहमीच तुमच्याबरोबर शेअर करतो आणि मला वाटले की, यावेळीही खूप काही घडत आहे आणि मी ते तुमच्याबरोबर शेअर केले पाहिजे. मला आणि माझ्या कुटुंबाला नेहमीच पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला माहीत आहे की, माझे कुटुंब माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे, विशेषतः माझी पत्नी आणि माझा मुलगा… ते नेहमीच माझ्याबरोबर राहिले आहेत. माझ्या सर्व चढ-उतारांमध्ये ते तिथे राहिले आहेत; परंतु काही परिस्थितींमुळे मला वेगळा मार्ग निवडावा लागत आहे आणि मी कधीही असे करेन, असे मला वाटले नव्हते. परंतु, मला वाटले की, तुम्हाला हे कुठून तरी कळण्यापूर्वी मी ते तुमच्याबरोबर शेअर केले पाहिजे.”

अर्जुन बिजलानीचा भावनिक व्हिडीओ

अर्जुन पुढे म्हणतो की, आयुष्यात कधी कधी अशा परिस्थिती उदभवतात की, तुम्हाला कठीण निर्णय घ्यावे लागतात. तो म्हणाला की, हा त्याच्या आयुष्यातील सर्वांत कठीण निर्णयांपैकी एक आहे. तो म्हणतो की, त्याचा निर्णय स्पष्ट होताच तो सर्वांना त्याबद्दल सांगेल.

अर्जुनच्या या व्हिडीओमुळे काही चाहते खूप चिंतेत आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका वापरकर्त्याने लिहिले- काय झाले? काही समस्या आहे का. मला आशा आहे की, सर्व काही ठीक असेल. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले- काय झाले अर्जुन? आम्हाला काळजी वाटत आहे. आशा आहे की, तू ठीक असशील. एका वापरकर्त्याने लिहिले- काय झाले अर्जुन? तुझा निर्णय काहीही असो… आम्ही तुझ्याबरोबर आहोत.

अर्जुन ‘बिग बॉस’चा भाग असेल का?

अनेक वापरकर्त्यांना असा विश्वास आहे की, अर्जुन या वर्षी सलमान खानच्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणार आहे आणि म्हणूनच त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. एका वापरकर्त्याने व्हिडीओवर कमेंट करीत लिहिले- बिग बॉस…? एका वापरकर्त्याने लिहिले- ट्रॉफी अर्जुनची आहे. तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले- मला वाटते की, निया शर्माप्रमाणे तोदेखील ‘बिग बॉस’मध्ये येत आहे.