‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ आणि ‘गुंजन सक्सेना: द कारगील गर्ल’मध्ये दिसलेला अभिनेता चंदन के आनंद सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘क्लास’ या वेब सीरिजमध्येही तो दिसला. याच वेब सीरिजच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत कास्टिंग काऊचबद्दल त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता चंदन के आनंदने सांगितलं की एका को-ऑर्डिनेचर त्याच्याकडे कामाच्या बदल्यात तडजोड करण्याची मागणी केली होती. याशिवाय या मुलाखतीत त्याने ग्लॅमर वर्ल्डशी जोडलं जाण्याआधीच्या दिवसांबद्दल आणि मनोरंजन क्षेत्रातील स्वतःच्या संघर्षाबद्दलही भाष्य केलं.

आणखी वाचा- लग्नाआधीच्या ‘त्या’ ट्वीटमुळे स्वरा भास्कर झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले, “आधी भाऊ म्हटलं आणि…”

अभिनेता चंदन आनंदने ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगितलं. तो म्हणाला, “लोक मला तडजोड करायला सांगायचे. मी माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत एका को-ऑर्डिनेटरला भेटलो होतो. तो मला म्हणाला तुला माहीत आहे ना इथे तडजोड करावी लागते. मी विचारलं हे काय असतं. तर त्याने मला म्हटलं तू मला तुझे फोटो दे मग तुला सांगतो. त्यानंतर मी त्या को-ऑर्डिनेटरच्या ऑफिसमधून पळून गेलो. मला वाटतं असे लोक संपूर्ण जगात आहेत. ज्यांचा एका अजेंडा असतो. पण तुम्हाला तुमच्या तत्त्वांवर कायम राहावं लागतं आणि खंबीर व्हावं लागतं. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुमच्याबरोबर कोणी चुकीचं वागत नाही.”

आणखी वाचा-“हास्यजत्रेत बोलतो ते स्क्रिप्टेड वाटावं इतकं…”, प्रसाद ओकसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंदन के आनंदने या मुलाखतीत त्याच्या संघर्षाबद्दलही सांगितलं. तो म्हणाला, “मनोरंजन क्षेत्राशी जोडण्याआधीचा काळ माझ्यासाठी कठीण होता. २००४ साली मी २ हजार रुपये घेऊन मुंबईत आलो होतो. पण माझ्याकडे माझी असंख्य स्वप्नं होती. मी ट्रेनचा प्रवास करून बोरीवलीला जात असे. त्यानंतर दुसरी ट्रेन पकडून मी गोरेगावला माझ्या कॉलेजच्या सीनियरच्या घरी जात असे. तो UTV च्या दूरदर्शनच्या शोमध्ये शेड्युलर म्हणून काम करत होता. मी ८ मुलांबरोबर एका रुममध्ये राहत असे. पण आज माझं मुंबईत स्वतःचं घर आहे. मला आज स्वतःचा अभिमान वाटतो.”