त्रिपुराचे भाजपा आमदार जादब लाल नाथ यांचा पॉर्न पाहतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना ते पॉर्न पाहत असल्याचे आढळून आले आहे. पॉर्न बघतानाचा त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी भाजपा नेत्याच्या या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकदा राजकीय आणि सामाजिक विषयांवर प्रतिक्रिया देणाऱ्या प्रकाश राज यांनी भाजपा आमदाराचे हे कृत्य लाजिरवाणे असल्याचे म्हटले आहे. प्रकाश राज यांनी तो व्हिडिओ ट्वीट करत टीका केली आहे.

हेही वाचा- “या गुंड लोकांचा…” बॉलिवूडच्या कंपूशाहीवर भाष्य करणाऱ्या प्रियांका चोप्राचं शेखर सुमन यांनी केलं समर्थन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जादब लाल नाथ यांचा हा व्हिडीओ ३० मार्चचा असल्याचे सांगण्यात आले. या व्हिडीओमध्ये ते सभागृहात बसलेले दिसत असून त्यांच्या हातात फोन आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच राजकीय खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही येत असून अनेक जणांनी जादब यांच्यावर टीकाही केली आहे.

अभिनेता प्रकाश राज यांची टीका

या व्हिडीओनंतर जादब लाल नाथ यांना पक्षाकडून नोटीसही पाठवण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती त्रिपुरा भाजपचे अध्यक्ष राजीव भट्टाचार्य यांनी दिली. मात्र, जादब लाल यांनी हे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा- परिणीती चोप्रा-राघव चड्ढांना ‘आप’ खासदारानंतर प्रसिद्ध गायकाकडूनही शुभेच्छा; म्हणाला, “मी पहिलाच..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जादब यांनी २०१८ मध्येच भाजपामध्ये प्रवेश केला होता. ते त्रिपुराच्या बागबासा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी सीपीएमच्या बिजिता नाथ यांचा पराभव करून आमदारकीची निवडणूक जिंकली. त्यानंतर २०२३ मध्येही त्यांनी आपली जागा कायम राखली.