एक अभिनेता म्हणून लोकप्रियता हवी असेल तर कोणत्या गोष्टी गरजेच्या असतात? चांगला लूक, चांगली बॉडी, उत्तम अभिनय आणि इतर काही गोष्टी. पण बॉलिवूडमध्ये काही अभिनेते असे आहेत ज्यांच्याकडे या सर्व गोष्टी असूनही त्यांचे चित्रपट फ्लॉप ठरले. तर काहींना प्रेक्षकांनी नाकारले. या यादीमधील एक अभिनेता म्हणजे साहिल खान.

साहिलने २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्टाइल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता शरमन जोशी मुख्य भूमिकेत होता. त्या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या चांगली पसंतीला उतरली होती. पण त्यानंतर साहिल बॉलिवूडमध्ये फारसा दिसला नाही. त्याने काही निवडक चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याच्या चित्रपटांनी फारशी कमाई केली नाही.

आणखी वाचा : ‘आमच्या पप्पांच्या लग्नाला यायचं हं’, संजना-अनिरुद्धच्या लग्नाची मजेशीर पत्रिका व्हायरल

साहिल खानने अभिनेत्री निगार खानशी २००४ साली लग्न केले. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. लग्नाच्या एक वर्षानंतरच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. अभिनेते जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफने साहिल गे असल्यामुळे पत्नीने घटस्फोट दिला असल्याचा म्हटले होते. तसेच साहिलने ८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ही त्यांनी केला होता. आयशा यांच्या मते साहिलच्या पत्नीला साहिल गे असल्याचे कळाल्यानंतर तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. या वादानंतर साहिल बॉलिवूडपासून लांब गेला.

साहिलने स्वत:ची जीम सुरु केली असून त्याच्या अनेक ब्रांच ओपन केल्या आहेत. त्याचे स्वत:चे एक यूट्यूब चॅनेल देखील आहे. तसेच मिनरल वॉटरचा देखील त्याचा बिझनेस आहे. साहिल चित्रपटांपासून लांब असला तरी कोट्यावधी रुपयांची कमाई करतो.