मराठी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज कलाकारांमध्ये अभिनेते शरद पोंक्षे यांचं नाव आदराने घेतलं जातं. आपल्या कामाप्रती एकनिष्ठ असलेल्या शरद पोंक्षे यांना २०१८च्या डिसेंबरमध्ये कर्करोगाचं निदान झालं. त्यानंतर कित्येक महिने त्यांनी कर्करोगावर उपचार घेतले. पण यादरम्यान त्यांचा बदलता लूक पाहून शरद पोंक्षे यांना ओळळखणंही कठिण झालं होतं. अखेरीस या आजारावर मात करत ते पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहेत.

आणखी वाचा – Video : महादेवाचं दर्शन घेण्यासाठी शिखर शिंगणापूरला पोहोचली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

पण या संपूर्ण प्रवास त्यांच्यासाठी काही सोपा नव्हता. कुटुंब, मित्र-परिवाराची यादरम्यान त्यांना उत्तम साथ मिळाली. आपला हा प्रवास इतरांपर्यंत पोहोचावा तसेच या आजाराशी झुंज देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यामधून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी यावर एक पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या आजाराबाबत तसेच त्यादरम्यान आलेल्या अनुभव याविषयी सांगितलं आहे.

शरद पोंक्षे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे खास पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. “प्रत्येकाला प्रत्येक संकटावर जिंकायला शिकवणारं माझं हे पुस्तक. वाचकांचा प्रतिसाद भरभरून मिळतो आहे. तुम्हीही वाचा, प्रतिक्रिया कळवा.” असं शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे. त्यांनी ही पोस्ट शेअर करताच आम्ही हे पुस्तक वाचलं असल्याचं काहींनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलं आहे.

आणखी वाचा – Video : “माझे स्तन तापसीपेक्षा…” अनुराग कश्यपचं ‘ते’ विधान चर्चेत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘दुसरं वादळ’ असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती असणार आहे. “एकीकडे वेदना होत असताना दुसरीकडे मात्र हसत हसत नाटकाची तालीम करत होतो.” असं शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांनीच लिहिलेलं वाक्या दिसत आहे. शरद पोंक्षे आता स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेमध्ये काम करताना दिसत आहेत.