अभिनेता शशांक केतकर हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या गोष्टी तो चाहत्यांबरोबर सोशल मीडियावरून शेअर करतो. तसेच त्याला खटकणाऱ्या सभोवतालच्या गोष्टी, त्याची मतंही तो स्पष्टपणे मांडताना दिसतो. आता नुकतीच त्याने एक पोस्ट केली आहे जी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्या पोस्टमधून त्याने सध्या नागरिकांना भेडसावत असलेल्या अत्यंत महत्वाच्या समस्येवर भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : ‘पुरुषोत्तम करंडक’च्या स्पर्धकांसाठी निपुण धर्माधिकारीने घेतला पुढाकार, राबवणार नवीन उपक्रम

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ

त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्याने त्याचा एक व्हिडीओ शेअर केला. तो व्हिडीओ आहे मालाडचा. या व्हिडीओत अत्यंत रहदरीच्या चौकात तेथील रस्त्याची किती दुरावस्था झाली आहे ती शशांकने नेटकऱ्यांना दाखवली आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये काही मुद्देही मांडले आहेत. त्याने लिहिले, “तू मूळचा पुण्याचा आहेस… तिथल्या रस्त्यांची काळजी कर तू. आम्हाला नको अक्कल शिकवू वगैरे म्हणणाऱ्या लोकांनी यातल्याच एका खड्ड्यात जीव द्या.”

“हा video मुळात कोणाच्या तरी support साठी आणि कोणाला तरी विरोध म्हणून केलेला नाही. हे प्रश्न जनतेचे आहेत आणि ते फक्त एका शहरापुरते मर्यादित नाहीत. हे देशातल्या सगळ्या roads बाददल माझं म्हणण आहे.”

पुढे शशांकने लिहिले, “रस्त्याच्या अशा अवस्थेला जे जबाबदार असतात त्यांनी एकदा हे imagine करून बघाव की ते त्यांच्या लहान मुला मुलीला या international school मध्ये सोडायला bike वरून आले आहेत किंवा म्हाताऱ्या आई बाबांना डॉक्टरकडे घेऊन आले आहेत किंवा बायको बरोबर आहेत किंवा अगदी एकटे आहेत आणि ती तुमची bike या खड्यात अडकून बंद पडली, तुमचा तोल गेला, मागून bus आली आणि तुमच्या डोक्याचा चुरा करून गेली! एकदा imagine करा ही भीती!”

हेही वाचा : ‘अत्यंत घाण भाषेत कलाकार सुद्धा…’, शशांक केतकर ट्रोलरवर संतापला

यापुढेही शशांकने काही मुद्दे मांडत रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल भाष्य केलं. त्यासोबतच ‘yenahichalega’ हा हॅशटॅग वापरून खराब झालेल्या रस्त्यांच्या विरोधात सर्वांनी एकत्र येत आवाज उठवण्याचं आवाहन केलं. त्याच्या या व्हिडीओला अनेकजण कमेंट करत त्याच्या मताशी सहमत असल्याचं सांगत आहेत. तसेच ‘yenahichalega’ हा वापरून वापरून शशांकला पाठिंबा देताना दिसत आहेत.