scorecardresearch

‘तमाशा लाईव्ह’मधील आणखी एक गाणे प्रदर्शित, सिद्धार्थ जाधव बनला गायक

विशेष म्हणजे हे गाणे स्वतः सिद्धार्थ जाधवने गायले आहे.

siddharth jadhav tamasha live
सिद्धार्थ जाधव तमाशा LIVE

अक्षय बर्दापूरकर निर्मित, संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट म्हणजे एक सांगितिक नजराणा आहे. आता यातील एक-एक पुष्प आपल्या समोर येत आहे. प्रेमगीत आणि रॅप साँग यानंतर आता ‘मेल्याहून मेल्यागात’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे सिद्धार्थ जाधववर चित्रीत झाले आहे. विशेष म्हणजे हे गाणे स्वतः सिद्धार्थ जाधवने गायले आहे.

होतास ना खंबीर, मग WHY SO गंभीर असे या गाण्याचे बोल आहेत. ‘मेल्याहून मेल्यागात’ या गाण्याला क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे. तर या गाण्याला पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे. या गाण्यातून सिद्धार्थ हा वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. एखादे सत्य शोधण्यासाठीची त्याची धडपड या गाण्यातून दिसत आहे.

“हा एक सांगितिक चित्रपट असल्याने या गाण्यांच्या माध्यमातून कथा पुढे जाणारी आहे. त्यामुळे या कथानकाला साजेसे आणि दमदार संगीत असणे आवश्यक होते. प्रत्येक गाण्यात आम्ही काही प्रयोग केले आहेत. या गाण्याच्या निमित्ताने सिद्धार्थ प्रथमच गाणे गायला आहे. त्यासाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे. इतर गाण्याप्रमाणे हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.” असे संगीतकार पंकज पडघन याने सांगितले.

“संगीताच्या माध्यमातून व्यक्तिरेखेची ओळख होणे, कथा पुढे जाणे ही संकल्पनाच खूप अनोखी आहे आणि प्रत्येक गाण्यात काहीतरी नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचा संजय जाधव यांचा प्रयत्न नक्कीच स्वागतार्ह आहे. यात त्यांना संगीत टीम उत्कृष्ट लाभल्याने या सगळ्याच गाण्यांना चारचाँद लागले आहेत. काहीतरी गूढ उलगडणारे हे गाणे अतिशय श्रवणीय आहे.’’ असे ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले.

प्लॅनेट मराठी, माऊली प्रॉडक्शन, एटीएट पिक्चर्स प्रस्तुत याने या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा तोलमारे, समीर केळकर, अजय उपर्वात सहनिर्मित या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येत्या १५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor siddharth jadhav melyahun melyagat song tamasha live movie nrp

ताज्या बातम्या