scorecardresearch

“गेला आठवडाभर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो…” सिद्धार्थ जाधवच्या पोस्टमुळे चाहत्यांची चिंता वाढली

सिद्धार्थ हा गेल्या आठवड्याभरापासून रुग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.

“गेला आठवडाभर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो…” सिद्धार्थ जाधवच्या पोस्टमुळे चाहत्यांची चिंता वाढली
सिद्धार्थ जाधव

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ जाधव हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सिद्धार्थ हा नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थचे एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्याच्या ‘तमाशा लाईव्ह’, ‘दे धक्का २’ हे चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी त्याच्या चाहत्यांना विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अपडेट देत असतो. नुकतंच सिद्धार्थ हा गेल्या आठवड्याभरापासून रुग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.
Exclusive Video : ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालन करणार आहेस का? सिद्धार्थ जाधव म्हणाला, “माझा विचार…”

सिद्धार्थ जाधवने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने त्याच्या हाताचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्याच्या हातावर हिंदुजा रुग्णालयातील बँड दिसत आहे. याला कॅप्शन देताना सिद्धार्थ म्हणाला, “नमस्कार …., गेला आठवडाभर मी hinduja hospital मध्ये admit होतो…आज घरी आलो… मनापासून आभार hinduja hospital च्या staff चं..खुप मनापासुन काळजी घेतली माझी… अभिनव महाडीक दादा आणि त्यांची संपूर्ण टिम… एका phone वर नेहमीच धावून येणारे, अमेय खोपकर दादा ….शशांक नागवेकर दादा lv u alwyss..

सतीश राजवाडे दादा आणि स्टार प्रवाह परिवार तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा होता….. आणि माझा मोठा भाऊ डॉ. लव्हेश जाधव जो रात्रभर जागून माझी काळजी घेत होता.. मी बरा व्हाव्हा म्हणून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं.. त्यांना मनापासून धन्यवाद…

आता हळूहळू बरा होतोय… खुप धावपळ असते आपली… पण त्यातही स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होणार नाही याची कृपया काळजी घ्या… लव्ह यू ऑल, #आपला सिध्दू”, असे सिद्धार्थ जाधव म्हणाला.

सिद्धार्थ जाधव हा रुग्णालयात का दाखल होता? यामागचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र त्याच्या पोस्टवर सेलिब्रेटींसह चाहते काळजी व्यक्त करत आहेत. नुकताच सिद्धार्थचा ‘दे धक्का २’ चित्रपट प्रदर्शित झाला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या