बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी फसवणुकीची बळी ठरली आहे. कुणीतरी तिच्या नकळत तिच्याच पॅन कार्डचा वापर करून कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. सनी लिओनीने ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली. माझ्या न कळत माझ्या पॅनकार्डचा वापर करण्यात आल्याने माझा सिबिल स्कोर खराब झाला असल्याचं सनी लिओनीने म्हटलं आहे.

त्याचबरोबर कर्ज देणाऱ्या कंपनीवरही सीन लिओनने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, नंतर तिच्याकडून हे ट्विट डिलीट केले गेले आहे. सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वापरकर्ते इंडियाबुल्सच्या फिनटेक प्लॅटफॉर्म धनी स्टॉक्स लिमिटेडवर कर्जाच्या फसवणुकीची तक्रारी करताना दिसत आहेत.

सनी लिओनीने देखील आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची माहिती ट्विटद्वारे दिली. ट्विटरवर या प्रकरणाशी संबंधित एक बातमी शेअर करताना सनी लिओनीने लिहिले होते की, माझ्या नकळत माझ्या पॅन नंबरचा वापर करून कोणीतरी दोन हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. यामुळे माझा CIBIL स्कोर (SIC) खराब झाला. मात्र, नंतर तिने ट्विटर हँडलवरून हे ट्विट डिलीट केले.

तसेच, सनी लिओनीने इंडियाबुल्स सिक्युरिटीज लिमिटेड (धानी स्टॉक्स पूर्वी इंडियाबुल्स सिक्युरिटीज होते) आणि इंडियाबुल्स होम लोनला देखील टॅग केले आहे, कंपनीने या प्रकरणाचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी काहीही केले नाही, असा आरोपही केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सनीच्या या ट्विटनंतर हे प्रकरण सातत्याने जोर धरत आहे. अशा फसवणुकीला बळी पडलेल्या अनेकांना आता अनेक फोन येत आहेत, तर काही लोकाच्या नावे कारणे दाखवा नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.