मराठीसह हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा अवीट ठसा उमटविणारे आणि शोले चित्रपटातील कालिया पात्र अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. खोटे यांनी हिंदी आणि मराठी अशा एकूण तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. १९६४ साली त्यांनी ‘या मालक’ सिनेमामधून सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी ‘अनोखी रात’, ‘जिने की राह’, ‘पगला कही का’, ‘रामपूर का लक्ष्मण’, ‘शरीफ बदमाश’, ‘जलते बदन’, ‘बेनाम’, ‘जुर्म और सजा’, ‘इन्सानियत’ अशा अनेक सिनेमांमध्ये काम केले. मात्र १९७५ साली आलेल्या ‘शोले’ या सिनेमातील त्यांची ‘कालिया’ ही भूमिकेने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. त्यानंतर ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमातील त्यांनी साकारलेली ‘बळी’ ही नकारात्मक भूमिकाही चांगलीच लक्षात राहिली. तसेच ‘अंदाज अपना अपना’मध्ये साकारलेला ‘रॉबर्ट’ही अनेकांच्या चांगलाच लक्षात राहिला. पाहूयात त्यांनी काम केलेल्या सिनेमांची यादी…

शोले
अशी ही बनवाबनवी
आयत्या बिळावर नागोबा
एक उनाड दिवस
प्रेमासाठी कमिंग सून
नवरा माझा भवरा
या मालक
अदला बदली
गोष्ट लग्ना नंतरची
मस्करी
महारेचा निरोप
पिंतरा
क्लब ६० (हिंदी)
गोलमाल ३ (हिंदी)
अतिथी तूम कब जाओगे (हिंदी)
अजब प्रेम की गजब कहानी (हिंदी)
पेईंग गेस्ट (हिंदी)
धुंडते रेह जाओंगे (हिंदी)
मनी हैं तो हनी हैं (हिंदी)
खुशबू (हिंदी)
हल्ला बोल (हिंदी)
फॅमेली: टाइज ऑफ ब्लड (हिंदी)
विरुद्ध: फॅमेली कम्स फर्स्ट (हिंदी)
पेहचान: द फेस ऑफ ट्रूथ (हिंदी)
खुल्लम खुल्ला प्यार करे (हिंदी)
इन्सान (हिंदी)
उत्तरायण (हिंदी)
शरारत (हिंदी)
आमदनी अठ्ठणी खर्चा रुपय्या (हिंदी)
खिलाडी ४२० (हिंदी)
आगाझ (हिंदी)
हद कर दी आपने (हिंदी)
पुकार (हिंदी)
मेला (हिंदी)
चायना गेट (हिंदी)
आग (हिंदी)
जय किशन (हिंदी)
अंदाज अपना अपना (हिंदी)
जनम से पहिले (हिंदी)
प्रे शक्ती (हिंदी)
बेटा हो तो ऐसा (हिंदी)
बंजारन (हिंदी)
डान्सर (हिंदी)