लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे अखेर विवाहबंधनात अडकली होती. तिने तिचा प्रियकर विकी जैन याच्यासोबत लग्नगाठ बांधली. मुंबईत राजेशाही थाटात अंकिता-विकीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. अंकिता आणि विकी जैन यांनी आता नुकतंच एक महागडी मर्सिडीज गाडी खरेदी केली आहे. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अंकिता आणि विकी जैन यांनी मर्सिडीज V220d ही नवीन गाडी खरेदी केली आहे. ही गाडी खरेदी करतेवेळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने अंकिता आणि विकीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता आणि विकी जैन हे गाडीचे कव्हर काढताना दिसत आहे.
त्यानंतर ते दोघेही नव्याकोऱ्या कारजवळ केक कापून आनंदही साजरा केला. यावेळी अंकिताच्या चेहऱ्यावरचा गाडी खरेदी केलेल्याचा आनंद स्पष्ट दिसत आहे. अंकिता आणि विकी हे दोघेही गाडीत बसून गाडीबद्दलची माहिती घेताना दिसत आहे.
Mercedes V 220 d हे गाडी महागड्या गाडींपैकी एक आहे. Mercedes V 220 d या मॉडेलची किंमतही १ कोटींहून अधिक आहे. बिल गेट्सच्या कार कलेक्शनमध्येही या गाडीचा समावेश होतो.
“एका हातात लाटणं, दुसऱ्या हातात डब्बा…”; शिल्पा शेट्टीच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर पाहिलात का?
अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन हे दोघेही स्मार्ट जोडी असे या रिअॅलिटी शोमध्ये झळकणार आहे. लग्नानंतर तीन महिन्यांनी अंकिता पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर परतणार आहे. विशेष म्हणजे अंकिता लोखंडे आणि विकी जैन एकत्र या टीव्ही शो मध्ये झळकणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान स्टार प्लसवर येत्या शनिवारी रात्री ८ वाजता हा कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे. यात मोनालिसा आणि विक्रांत सिंग राजपूत, गौरव तनेजा आणि रितू तनेजा, अर्जुन बिजलानी आणि नेहा बिजलानी, ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट, भाग्यश्री आणि हिमालय दासानी, नताल्या इलिना आणि राहुल महाजन, अंकित तिवारी आणि पल्लवी शुक्ला यांसह विविध जोड्या सहभागी होणार आहेत.