वाचा, का अनुष्का झाली फोटोशूटवरून ट्रोल ?

मुंबईत ‘मोस्ट स्टायलिस्ट अवॉर्ड फंक्शन’चं आयोजन करण्यात आलं होतं.

नुकतंच मुंबईत ‘मोस्ट स्टायलिस्ट अवॉर्ड फंक्शन’चं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार, दिग्दर्शक उपस्थित होते. शाहरूख खान, अक्षय कुमार, करण जोहर यासारख्या स्टार्सनंही सर्वांची मनं जिंकली. या फंक्शनमध्ये अनुष्का शर्माचाही हटके अंदाज पहायला मिळाला. या फंक्शनमधील काही फोटोस अनुष्काने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना काही जणांकडून वाहवा मिळाली, तर काही जणांनी यावरून तिला ट्रोलही केलंय. ट्रोल करण्याचं मुख्य कारण म्हणजे तिने यामध्ये दिलेली पोझ.

या फोटोंमध्ये ती ब्लॅक गाऊनमध्ये दिसत आहे. तसंच आपल्या कंबरेवर हात ठेवून तिने एक पोझ दिली आहे. परंतु या पोझवरूनच ट्रोलर्सनी तिची खिल्ली उडवली आहे. अनेकांनी तिच्या फोटोखाली तिला कंबरदुखीचा त्रास आहे का? तसंच ही कोणत्या प्रकारची पोझ आहे, असं विचारत तिची खिल्ली उडवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

या अवॉर्ड फंक्शनमध्ये अनुष्काचा हटके अंदाज सर्वांच्याच मनाला भूरळ पाडत होता. यामध्ये ती ब्लॅक लूकमध्ये दिसली होती. तिने काळ्या रंगाचा बॉडीकॉन गाऊन घातला होता. याव्यतिरिक्त तिने डायमंडचे इयररिंग्सही घातले होते. यापूर्वी अनुष्का शर्मा शाहरूख खानच्या ‘झिरो’ या चित्रपटातून झळकली होती. परंतु या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. ती आता दिग्दर्शक श्री नारायण सिंग यांच्या ‘जॅसमिन’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. श्री नारायण सिंग यांनी अक्षय कुमारचा ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ हा चित्रपट केला होता. त्यानंतर त्यांनी ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actress anushka sharma photoshoot got trolled mumbai award function jud

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या