अयोध्येतला २२ जानेवारीचा राम मंदिरातल्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी दोन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यातली एक मूर्ती ही अरुण योगीराज यांनी घडवली आहे. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची उपस्थिती होती. अभिनेत्री कंगना रणौत, हेमा मालिनी, अमिताभ बच्चन, मधुर भंडारकर, सुभाष घई, सोनू निगम, विकी कौशल, माधुरी दीक्षित असे सगळेच स्टार या सोहळ्यात उपस्थित होते. त्याचप्रमाणे श्री श्री रविशंकर, बागेश्वर धाम धीरेंद्र कृष्ण शास्त्री, मोरारी बापू यांचीही उपस्थिती होती. राम मंदिरातल्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर कंगनाने साधूसंतांचीही भेट घेतली. बागेश्वर धाम सरकार म्हणजेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची भेट घेतल्यावर तिने एक पोस्ट लिहिली आहे ज्याची चर्चा होते आहे.

काय आहे कंगनाची पोस्ट?

इंस्टा स्टोरीत कंगना म्हणते, “मी पहिल्यांदा माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या गुरुजींना भेटले. माझ्यापेक्षा बागेश्वर धाम सरकार म्हणजेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे दहा वर्षांनी लहान आहेत. छोट्या भावाला आपण जशी मिठी मारतो त्याचप्रमाणे मलाही वाटत होतं की त्यांच्या गळ्यातच पडावं. पण नंतर लक्षात आलं की कुणीही वयाने गुरु होत नाही तर कर्माने गुरुचा मान मिळवतो. गुरुजींचे चरणस्पर्श केले आणि आशीर्वाद घेतला. जय बजरंग बली.” असं म्हणत कंगनाने इंस्टा स्टेटस ठेवलं होतं. जी स्टोरी चांगलीच व्हायरल झाली आहे.

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
Sanjay Raut Compares Modi with Gabbar Sing
संजय राऊत आधी मोदींना म्हणाले औरंगजेब, आता तुलना थेट शोलेतल्या गब्बरशी, म्हणाले; “लोक त्यांना..”
Raj Thackeray
“शिंदे-फडणवीस मला सतत…”, राज ठाकरेंनी सांगितलं अमित शाहांची भेट घेण्याचं कारण
Kangana met Bageshwar dham Sarkar in Ayodhya
कंगना रणौतने इंस्टा स्टोरीवर जी पोस्ट लिहिली आहे त्या पोस्टची चांगलीच चर्चा होते आहे.

अयोध्येत बॉलीवूडचे सगळे कलाकार पारंपरिक वेशात गेले होते. प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर या कलाकारांनी मंदिराच्या परिसरात अनेक सेल्फी घेतले. यातील माधुरी दीक्षितच्या पतीने बॉलीवूड कलाकारांसह घेतलेला एक सेल्फीही चर्चेत आला. या फोटोमध्ये सगळे कलाकार उत्साहात असल्याचं पाहायला मिळत आहे.

सोमवारी सकाळी अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, अनुपम खेर, कैलाश खेर, प्रसून जोशी, अनिल अंबानी, मुकेश अंबानी यांसारख्या दिग्गजांचं अयोध्येत आगमन झालं. यावेळी मान्यवरांचं स्वागत रामनामाचा शेला आणि छोटी घंटा देऊन करण्यात आलं. आरतीच्या वेळी सर्व उपस्थितांनी घंटानाद केला. मंदिराच्या आवाराज अमिताभ बच्चन यांनी ‘रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर भाजप खासदार रविशंकर प्रसाद आणि उद्योगपती अनिल अंबानी यांचीही त्यांनी भेट घेतली. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सरोद वादक अमजद अली खान, अभिनेता अजय देवगण आणि गायिका श्रेया घोषाल यांच्यासह अनेक व्यक्तींनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या.

५०० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पंतप्रधानांनी विधीवत पूजा करून अयोध्येच्या राममंदिरात रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हेलिकॉप्टरमधून राम मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या सोहळ्यासाठी अयोध्येत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.