अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. आपला दिनक्रम, चित्रपट, कुटुंबाबाबत ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसते. चाहत्यांनी संवाद साधण्याचा हा तिचा अनोखा फंडा आहे. प्राजक्ता सुत्रसंचालन करत असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने काही काळासाठी ब्रेक घेतला होता. आता पुन्हा हा कार्यक्रम नव्या जोमाने सुरु झाला आहे. सध्या आपण लंडनला असल्याचं प्राजक्ताने फोटो पोस्ट करत सांगितलं होतं.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ब्रेक घेत ‘या’ अभिनेत्यासह प्राजक्ता माळी लंडनला रवाना, म्हणाली, “माझ्या मित्राबरोबर…”

पण ती लंडनला का गेली? यामागचं कारण आता समोर आलं आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेबरोबर प्राजक्ता लंडनला गेली असल्याचं तिने सांगितलं. आता प्राजक्ताने एक नवी पोस्ट आणि फोटो शेअर करत परदेशात जाण्यामागचं कारण सांगितलं आहे. एका नव्या मराठी चित्रपटासाठी प्राजक्ताच्या नावाची वर्णी लागली आहे. याच चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती लंडनला पोहोचली आहे.

ती फोटो शेअर करत म्हणाली, “हो शुभारंभ हा शुभारंभ मंगल बेला आयी. लंडनमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु. जवळपास अर्धी मराठी चित्रपटसृष्टी लंडनला येऊन चित्रपटांचं चित्रीकरण करून गेली. मलाही हा अनुभव घ्यायचा होता. ऋषिकेश जोशी, नितीन वैद्य सरांचे मनापासून आभार. पण यादरम्यान माझा कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पाहायला विसरु नका.”

आणखी वाचा – Viral Video : ‘ब्रह्मास्त्र’ पाहिल्यानंतर आलिया भट्टची मिमिक्री करणाऱ्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल, तुम्हालाही हसू होईल अनावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राजक्ता वैभव तत्त्ववादी, संकर्षण कऱ्हाडे या कलाकारांबरोबर आगामी मराठी चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव, चित्रपटामधील प्राजक्ताची भूमिका याबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल. प्राजक्ता सध्या मराठी चित्रपटांमध्येही उत्तमोत्तम भूमिका साकारताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘वाय’ चित्रपट प्रदर्शित झाला.