आपल्या अभिनयासोबतच बिनधास्त वक्तव्यामुळे अनेकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. तिने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता पुन्हा एक वेगळा विषय घेऊन तापसी प्रेक्षकांच्या भेटीला येणाार आहे. या चित्रपटाचे नाव ‘थप्पड’ असे असून चित्रपट महिलांचा विषय समोर आणणार आहे. पण या चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलवर खुद्द तापसीने बंदी घालण्याची मागणी केली आहे. तिच्या या भलत्याच मागणीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये एका माहिलेला मारलेली थप्पड ही साधी बाब नसल्याचे सांगताना तापसी दिसत आहे. अशा व्हिडीओंना इंटरनेटवर कोणतेच स्थान नाही, तसेच युट्युबच्या नियांनुसार हा व्हिडीओ हिंसेला प्रोत्साहन देणारा असल्याने तो ‘रिपोर्ट’ करण्याचे आवाहन तापसीने केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरमध्ये पतीने पत्नीला फक्त कानाखाली मारल्याची गोष्ट आहे पण… हा ट्रेलर ‘फक्त कानाखालीच मारली ना’ असे म्हणत अगदी सहजतेने या विषयाकडे बघणाऱ्यांना चपराक लगावणारा आहे. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या दाम्पत्यामध्ये ‘थप्पड’चा विषय काय वळण घेऊन येतो हे याची झलक पहिल्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. येत्या २८ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.