अभिनेत्री वैदेही परशुरामी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाली आहे. वैदेहीने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत भूमिका साकारत आपला एक वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मनोरंजनसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव सामील आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्यामुळे तिचा मोठा चाहता वर्ग बनला आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘झोंबिवली’ या तिच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ती आता पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतंच या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं.

हेही वाचा : ‘द फेम गेम’ सिरीजचा दुसरा सीझन नेटफ्लिक्स प्रदर्शित करणार नाही; कारण…

या चित्रपटाचं नाव ‘एक दोन तीन चार’ असं आहे. या चित्रपटात वैदेही परशुरामीबरोबर अभिनेता निपुण धर्माधिकारी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एक हलकी-फुलक लव्हस्टोरी असणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून निपुण आणि वैदेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

वैदेहीने सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. तिने या पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘चार खोके एकदम ओके! #nopoliticaldrama… जिओ स्टुडिओज घेऊन येत आहे, वैदेही आणि निपुणची सरप्राईजवाली हटके लव स्टोरी !….लवकरच तुमच्या जवळच्या सिनेमागृहांत!’ त्यासोबतच निपुणनेही या चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

आणखी वाचा : ‘झोंबिवली’ चित्रपटाचे शूटींग डोंबिवलीत का झाले नाही? दिग्दर्शकाने सांगितले खरे कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकप्रिय दिग्दर्शक वरुण नार्वेकर ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. त्याने यापूर्वी मुरांबा सारखा चित्रपट तसेच ‘…आणि काय हवं!’ या गाजलेल्या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातून निपुण धर्माधिकारी आणि वैदेही परशुरामी ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने त्यांचे चाहते या चित्रपटासाठी ‌खुप उत्सुक असल्याचे दिसत आहे.